विज्ञानाने उत्कर्ष; विचारांनी उन्नती

By Admin | Published: June 26, 2017 04:05 AM2017-06-26T04:05:37+5:302017-06-26T04:05:37+5:30

‘जीवनात वास्तववाद, प्रयत्नवाद आणि विकासवाद यांना महत्त्वाचे स्थान आहे. विज्ञानाची कास धरून उत्कर्ष आणि विचारांच्या

Science flourishing; Ideas advancement | विज्ञानाने उत्कर्ष; विचारांनी उन्नती

विज्ञानाने उत्कर्ष; विचारांनी उन्नती

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘जीवनात वास्तववाद, प्रयत्नवाद आणि विकासवाद यांना महत्त्वाचे स्थान आहे. विज्ञानाची कास धरून उत्कर्ष आणि विचारांच्या आधारे उन्नती मिळवणे आवश्यक आहे. तसेच विवेकाची जोड नसले तर विकास हा भकास होतो,’ असे मत सद्गुरू वामनराव पै यांचे पुत्र प्रल्हाद वामनराव पै यांनी व्यक्त केले.
जीवनविद्या मिशन कोथरूड शाखेच्या वतीने सर्व शास्त्र, कला, ज्ञान-विज्ञान किंबहुना विश्वाचा पाया असणारा ‘परमेश्वर नेमका आहे कसा?’ या विषयावरील साखळी चिंतन मालिकेचे उद्घाटन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, लोकमतचे संपादक विजय बाविस्कर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रल्हाद वामनराव पै यांनी प्रबोधन केले. कार्यक्रमास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीरंग चव्हाण-पाटील, जीवनविद्या मिशन पुणे शाखेचे माजी अध्यक्ष शैलेश जोशी, कोथरूड शाखेचे अध्यक्ष चंद्रशेखर मोरे, जीवनविद्या फाऊंडेशनचे विश्वस्त संतोष सावंत, सुभाष केळकर, मिशनचे सचिव विवेक बावकर, खजिनदार गिरीश कालव, किशोर शिंदे, प्रकाश वीरकर आदी उपस्थित होते. सर्जिकल स्ट्राईकमध्ये सहभागी झालेल्या मेजर हर्षल कचरे यांचा सत्कार करण्यात आला.
मुक्ता टिळक, विजय बाविस्कर यांनी मनोगत व्यक्त केले. कृष्णा जोशी यांनी भजन सादर केले. चंद्रशेखर मोरे यांनी प्रास्ताविक केले. संतोष तोत्रे यांनी सूत्रसंचालन केले. जीवन मिशन कोथरूड शाखेचे कार्याध्यक्ष कृष्णा पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Science flourishing; Ideas advancement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.