जीवनातील आव्हानांसाठी वैज्ञानिक उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 02:25 AM2018-12-20T02:25:59+5:302018-12-20T02:27:37+5:30
मुळशी तालुका विज्ञान प्रदर्शन : विवेकानंद विद्यालय आसदे, ४१ शाळांनी सादर केले ७९ प्रकल्प
पौड : मुळशी तालुका विज्ञान प्रदर्शन २०१८-१९ हे दोन दिवसीय प्रदर्शन राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्थेच्या स्वामी विवेकानंद विद्यालय आसदे येथे संपन्न झाले. या प्रदर्शनात तालुक्यातील २८ माध्यमिक व १३ प्राथमिक अशा एकूण ४१ शाळांमधून ७९ प्रकल्प सादर करण्यात आले होते.
प्रदर्शनाचे उद्घाटन आयशरचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू, पंचायत समिती मुळशीचे माजी सभापती बाळासाहेब चांदेरे, सहायक गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर, गटशिक्षणाधिकारी माणिक बांगर, आसदे सरपंच नरेश भरम, भादसचे सरपंच राजेंद्र मेंगडे, खुबवलीचे सरपंच मुकुंद गायकवाड, आणि संस्थेचे विश्वस्त अनिल व्यास, पूनम मेहता यांच्या उपस्थितीत झाले. या प्रदर्शनात ‘जीवनातील आव्हानांसाठी वैज्ञानिक उपाय’ या विषयावर आधारित नावीन्यपूर्ण वैज्ञानिक प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले. प्रकल्पांचे परीक्षण भोर तालुक्यातील विज्ञानशिक्षक कांबळे, भणगे व दीक्षित मॅडम यांनी केले. या विज्ञान प्रदर्शनाबरोबरच वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजूषा स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते.
प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी विस्तार अधिकारी सुदाम वाळुंज, मधुकर येनपुरे तसेच मुख्याध्यापक जिल्हा व तालुका मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी, केंद्रप्रमुख यांचे मार्गदर्शन लाभले. प्रदर्शनाचे यशस्वी संयोजन विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक सतीश शिंदे आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आयबीटी विभागांनी केले.
प्रश्नमंजूषा स्पर्धा - प्रथम क्रमांक - साईराम बच्छाम वाकचौरे, छत्रपती शिवाजी विद्यालय पौड, द्वितीय - आश्विनी धुमाळ,ईश्वरी लेकुरवाळे, राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळा कासार आंबोली, तृतीय - वंदना मेणे, सानिया पठाण -संपर्क ग्रामीण विद्यालय भांबर्डे
प्रदर्शनातील विजेते स्पर्धक गट :
उच्च प्राथमिक गट (इ.६ वी ते ८वी) - प्रथम क्रमांक - मेणे वंदना मारुती (संपर्क विद्या विकास केंद्र भांबर्डे), द्वितीय - विकास प्रशांत पाटील (स्वामी विवेकानंद विद्यालय आसदे), तृतीय - सार्थक माझिरे
४माध्यमिक गट - (इयत्ता ९ ते १२) - प्रथम क्रमांक - पीयूषा समीर शहा (राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार आंबोली), द्वितीय- गौरव गंगाराम गोरे (श्री विंझाईदेवी हायस्कूल, ताम्हिणी), अनिकेत कैलास काकडे( स्व. बाबूराव रायरीकर विद्यालय, उरावडे)
४शैक्षणिक साहित्य गट - (प्राथमिक शिक्षक गट)
४प्रथम क्रमांक - वैशाली नांदवडेकर, जि. प. शाळा बावधन, द्वितीय - यू. पी. झोळ, जि.प. शाळा कामतवाडी, लोकसंख्या शिक्षण (प्राथमिक शिक्षक) परमेश्वर भारत जाधव, जि. प. शाळा लवळे
४शैक्षणिक साहित्य गट (माध्यमिक शिक्षक गट)- चंद्रकांत सुतार, विद्या विकास मंदिर, आंदगाव
४वक्तृत्व स्पर्धा - लहान गट (इयत्ता ६ वी ते ८ वी )
४प्रथम क्रमांक - नेहा नीलेश केमसे, स्व. बाबूराव रायरीकर विद्यालय उरावडे, द्वितीय- भूमी हनवले, राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार आंबोली, तृयीय - धनंजय श्रेया जाठोडे, पिरंगुट इंग्लिश स्कूल पिरंगुट
४वक्तृत्व स्पर्धा मोठा गट (९ ते
१२वी) प्रथम क्रमांक - सुकन्या रायरीकर, छत्रपती शिवाजी विद्यालय पौड, द्वितीय - संचिता हनुमंत शेलार, सेनापती बापट विद्यालय, माले, तृतीय - श्वेता संतोष रावडे- स्वामी विवेकानंद विद्यालय, आसदे.