मुळा-मुठेचा केला वैज्ञानिक अभ्यास
By admin | Published: May 14, 2014 05:46 AM2014-05-14T05:46:48+5:302014-05-14T05:46:48+5:30
मासेमारी करणार्यांची मुलाखत आणि सांडपाणी शुद्धीकरण केंद्रांचा अभ्यास करून अभियांत्रिक महाविद्यालय बोट क्लबच्या विद्यार्थ्यांनी अहवाल तयार केला आहे.
पुणे : मुळा-मुठेच्या पात्रातील झाडांची मोजणी, नाल्यांच्या स्थानांची माहिती, मासेमारी करणार्यांची मुलाखत आणि सांडपाणी शुद्धीकरण केंद्रांचा अभ्यास करून अभियांत्रिक महाविद्यालय बोट क्लबच्या विद्यार्थ्यांनी अहवाल तयार केला आहे. प्रदूषणामध्ये घट होऊन नदीचे संवर्धन व्हावे, या दृष्टीने हा अहवाल पुणे महापालिका आयुक्तांना देण्यात आला आहे. जलमैत्री उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये विविध शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना एकत्र करून ‘मुळा-मुठा प्रदूषण समस्या व उपाय’ या विषयावरील पथनाट्ये, भाषणे सादर केली जात आहेत. तसेच, विठ्ठलवाडी ते अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंत जनजागृती फेर्या काढण्यात आल्या. अहवालात मासेमारी करणार्यांच्या मुलाखती, झाडांची नोंद व सांडपाणी शुद्धीकरण केंद्रांची स्थिती पाहून अहवाल तयार केला असल्याने पालिकेला उपयोगी पडेल.