स्वच्छता ,सॅनिटायझरमुळे शिक्षकांच्या खिशाला कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:11 AM2021-01-22T04:11:34+5:302021-01-22T04:11:34+5:30

पुणे: राज्यातील नववी ते बारावीपर्यंचे वर्ग सुरू झाले असून, येत्या 27 जानेवारी रोजी पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू होणार ...

Scissors in teacher's pocket due to sanitation | स्वच्छता ,सॅनिटायझरमुळे शिक्षकांच्या खिशाला कात्री

स्वच्छता ,सॅनिटायझरमुळे शिक्षकांच्या खिशाला कात्री

googlenewsNext

पुणे: राज्यातील नववी ते बारावीपर्यंचे वर्ग सुरू झाले असून, येत्या 27 जानेवारी रोजी पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू होणार आहेत. शाळा सुरू झाल्या असल्या, तरी त्यासाठी लागणा-या खर्चाचा भार मुख्याध्यापक व शिक्षकांच्या खांद्यावर पडला आहे. स्थानिक जिल्हा प्रशासन व पालिका प्रशासनाने शाळा स्वच्छता आणि सॅनिटायझरसाठी लागणारा निधी देण्यासाठी हात वर केले आहेत. त्यामुळे शिक्षक व मुख्याध्यापकांच्या खिशाला कात्री लागली आहे.

पुणे जिल्ह्यात इयत्ता नववी ते बारावीच्या २०८६ शाळा आहेत.त्या शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या १२ लाख ३ हजार १२८ एवढी आहे. आत्तापर्यंत त्यातील १ हजार १४१ शाळा सुरू झाले असून या शाळांमध्ये १ लाख २१ हजार ५३४ विद्यार्थी उपस्थित राहत असल्याचे दिसून आले आहे. परिणामी जिल्ह्यात ६८ टक्के शाळा सुरू झाल्या असून त्यात विद्यार्थी उपस्थिती केवळ १० टक्के आहे.राज्य शासनाने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून तयार करण्यात आलेल्या खडक नियमावलीचे पालन करणे अनेक शाळांना अद्याप शक्य झालेले नाही. त्यामुळे अजूनही अनेक माध्यमिक शाळांचे वर्ग सुरू झालेले नाहीत.

जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या पुणे विद्यार्थी संख्येच्या तुलनेत केवळ दहा टक्के विद्यार्थी शाळेत उपस्थित राहत आहेत. ग्रामीण भागातील काही शाळांमध्ये 60 ते 80 टक्क्यांपर्यंत विद्यार्थी उपस्थिती दिसून येत असली तरी शहरी भागांमधील काही शाळांमध्ये दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत सुद्धा विद्यार्थी उपस्थित राहत नसल्याची माहिती समोर आली आहे. शहरी भागातील अनेक पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी तयार नाहीत. तसेच शाळांना हमीपत्र लिहून देण्यास पालक तयार नाहीत.

शहरातील शाळांनी कोरोनानंतर शाळा सुरू करण्यासाठी शासन नियमानुसार आवश्यक तयारी पूर्ण केली आहे.

------------------------

Web Title: Scissors in teacher's pocket due to sanitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.