Pune | स्कॉर्पिओ आणि ट्रकचा भीषण अपघात; खेड तालुक्यातील पाच जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 02:20 PM2023-03-20T14:20:50+5:302023-03-20T14:23:57+5:30

भोरमळ्यातून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू केली होती...

Scorpio and truck crash; Five people from Khed taluka were seriously injured | Pune | स्कॉर्पिओ आणि ट्रकचा भीषण अपघात; खेड तालुक्यातील पाच जण गंभीर जखमी

Pune | स्कॉर्पिओ आणि ट्रकचा भीषण अपघात; खेड तालुक्यातील पाच जण गंभीर जखमी

googlenewsNext

अवसरी (पुणे) : आंबेगाव तालुक्यात अवसरी फाटा ते पारगाव रस्त्यावर अवसरी खुर्द गावाच्या हद्दीत उजव्या कालव्याजवळ संध्याकाळी उसाचा ट्रक व स्कार्पिओ गाडी यांची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात खेड तालुक्यातील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

प्राजक्ता प्रदीप ठाकूर (२७), ज्ञानदा प्रदीप ठाकूर (३, सर्व रा.ठाकूर पिंपरी, ता.खेड), चालक संतोष सोपान पवार (४०), अपर्णा संतोष पवार (३६), अदिती संतोष पवार (१०, सर्व रा.निघोजे, ता.खेड)जखमी झाले आहेत.

पिंपळगाव खडकी येथील त्यांचे जवळचे नातेवाईक देवराम अरगडे यांच्याकडे गेले होते. पाहुणचार घेतल्यानंतर ते स्कार्पिओतून (एम.एच १४ डी.एन ८५५६) निघोजे गावाकडे जात होते. त्याचवेळी पश्चिम बाजूने ऊस वाहतूक करणारा ट्रक (एम.एच.०४ एफ ७७२५) समोरून आला. दोन्ही वाहनांची धडक झाली. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

अपघात स्थळापासून जवळच राहणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर, शिवराज भोर, संदीप भोर, बाळासाहेब भोर, गौरव भोर, अर्जुन काजळे, विलास काळे, विकास भोर मदतीसाठी धावून आले. त्यांनी स्कार्पिओमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढले. सर्व जखमींना मंचर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गणेश शिंदे व गौरव बारणे ह्या रुग्णवाहिका चालकांनी दाखल केले आहे. पळून गेलेल्या ट्रकचालकाचा शोध पोलिस घेत आहेत. अपघातामुळे वाहतूक बंद पडली होती. भोरमळ्यातून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू केली आहे. मंचर पोलिस पोलिस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Scorpio and truck crash; Five people from Khed taluka were seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.