दोंदे परिसरात बिबट्याचा धुमाकूळ
By admin | Published: December 25, 2016 04:45 AM2016-12-25T04:45:17+5:302016-12-25T04:45:17+5:30
खेड तालुक्यातील दोंदे आगरमाथा कडूस भीमा नदीच्या परिसरात बिबट्यासदृश जंगली श्वापदाने रात्री घराच्या शेजारील बांधण्यात आलेल्या दोन शेळ्यांवर हल्ला केला.
चासकमान : खेड तालुक्यातील दोंदे आगरमाथा कडूस भीमा नदीच्या परिसरात बिबट्यासदृश जंगली श्वापदाने रात्री घराच्या शेजारील बांधण्यात आलेल्या दोन शेळ्यांवर हल्ला केला.
गुरुवारी रात्री सुनील सुकाळे यांच्या एका शेळीवर जंगली प्राण्याने केलेल्या हल्ल्यात शेळी जखमी झाली. तर दुसरी शेळी घेऊन पसार झाल्यानंतर दोंदे परिसरात बिबट्याच शेळी घेऊन गेला असल्याची शंका ग्रामस्थांनी व्यक्त केली. या मुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसऱ्या शेळीला बिबट्यासदृश प्राण्याने ओढून नेल्याचे जमिनीवरील खुणेमुळे दिसून येत आहे. वनविभागाने परिसरात शोधमोहीम राबवली आहे.
सध्या या परिसरातील ऊसतोडणी सुरू आहे, त्यामुळे जंगली श्वापद प्राण्याचे ठिकाण उघडे पडले आहे. वनपाल पी. एन. आढारी, वनरक्षक, पी. के. आवटे, अशोक वरुडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून परिसरातील नागरिकांच्या मदतीने शिवार फेरी मारून पाहणी केली. जंगली प्राण्यांचा नागरी वस्तीपर्यंत वावर वाढला असून, दोंदे, आगरमाथा या भागात बिबट्या असून वनविभागाला निवेदन दिले आहे. या बाबत दखल घेऊन पिंजरा लावण्याची मागणी उपसरपंच दत्तात्रय शितोळेंसह ग्रामस्थांनी केली आहे.