स्क्रॅपच्या दुकानाला शाॅर्टसर्किटमुळे आग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 08:21 PM2020-03-29T20:21:53+5:302020-03-29T20:23:01+5:30

शाॅर्टसर्किटमुळे स्क्रॅपच्या दुकानाला आग लागल्याची घटना शिराेली येथे घडली

Scrap shop fire due to short-circuit rsg | स्क्रॅपच्या दुकानाला शाॅर्टसर्किटमुळे आग

स्क्रॅपच्या दुकानाला शाॅर्टसर्किटमुळे आग

Next

राजगुरुनगर: शिरोली ता खेड येथे पुणे नाशिक महामार्गावर असलेल्या स्क्रॅपच्या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली या आगीत सुमारे तीन ते चार लाखाचे नुकसान झाले आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी कि, आज दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास येथील बाळासाहेब  घुमटकर व जनार्दन साळुंके यांचे पुणे नाशिक महामार्गावर शिरोली जवळ कंपनीतील पॅकिंग पेपरचे स्क्रॅपचे दुकान होते. आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास येथील तारांवर कावळे बसले होते ते उडताना तारेला तारेचा स्पर्श झाल्याने शॉर्ट सर्किट झाले. त्यातून आगीचा मोठा भडका उडाला आणि येथील पॅकिंग स्क्रॅपच्या कागदानी भडका घेतला. स्थानिक ग्रासमथांच्या तत्काळ लक्षात आले. त्यांनी खेड पोलीस व अग्निशामक दलाच्या आणि राजगुरूनगर नगर परिषदेच्या अग्निशामक दलाची संपर्क केला. घटनास्थळी पिंपरी चिंचवड महानगर पालिका, चाकण एमआयडीसी, सेझ आणि राजगुरूनगर नगर परिषदेच्या अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी  दाखल झाल्या त्यांच्या माध्यमातून आगी विझवण्यात आली मात्र या गाड्या येण्यास विलंब झाल्याने आगीत मोठे नुकसान झाले.पीसीएमसी, महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ, सेझ व राजगुरूनगर नगर परिषदेच्या आगीच्या बाँबच्या साहाय्याने आग विझवण्यात आली मात्र आगीचे बंब पोहोचेतोपर्यंत सर्व माल जळून खाक झाला होता..
 

Web Title: Scrap shop fire due to short-circuit rsg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.