‘पिफ’चा पडदा उद्या उघडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 01:37 AM2019-01-10T01:37:07+5:302019-01-10T01:37:23+5:30

गोविंद निहलानी व दिलीप प्रभावळकर : ‘पिफ डिस्टिंग्विश्ड पुरस्कार’ देऊन गौरवणार

The screen of 'PIF' will open tomorrow | ‘पिफ’चा पडदा उद्या उघडणार

‘पिफ’चा पडदा उद्या उघडणार

Next

पुणे : देशविदेशातील विविध चित्रपटांची पर्वणी असलेल्या ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’ला उद्या (गुरुवार)पासून प्रारंभ होणार आहे. पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित या महोत्सवात ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी आणि ज्येष्ठ अभिनेते व लेखक दिलीप प्रभावळकर यांना ‘पिफ डिस्टिंग्विश्ड पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. निहलानी आणि प्रभावळकर यांना अनुक्रमे राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल. तर, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्ते संगीतकार राम-लक्ष्मण यांना ‘एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अ‍ॅवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक अँड साऊंड’ हा पुरस्कार प्रदान केला जाईल.

‘इन सर्च आॅफ ट्रूथ- सेलिब्रेटिंग १५० इयर बर्थ अ‍ॅनिव्हर्सरी आॅफ महात्मा गांधी’ अशी यंदाच्या ‘पिफ’ची प्रमुख ‘थीम’ असून त्यात महोत्सवात महात्मा गांधी यांना चलचित्र आदरांजली वाहणार आहे. प्रसिद्ध अभिनेते सुमीत राघवन व क्षितिज दाते आदी महोत्सवाचे सूत्रसंचालन करणार आहेत. उद्घाटन सोहळ्याची सुरुवात ग्लॅडिस फर्नाडेझ व संतोष अवतरामानी यांच्या टँगो नृत्याने होणार आहे. तर, कार्यक्रमानंतर ‘डॅम किड्स’ हा गोन्जालो जस्टिनिअ‍ॅनो दिग्दर्शित स्पॅनिश चित्रपट महोत्सवाची ‘ओपनिंग फिल्म’ म्हणून दाखविला जाणार आहे.

विविध देशांतील चित्रपटांची मेजवानी
४महोत्सवात देश-विशेष (कंट्री फोकस) विभागात हंगेरीचे ४, अर्जेंटिनाचे ६ तर टर्कीमधली ३ चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. याशिवाय, विद्यार्थी विभागातील लाईव्ह अ‍ॅक्शन विभागात लिथुनिया, अमेरिका, भारत, स्वित्झर्लंड आणि मॅक्सिको या पाच देशांतील सहा चित्रपट, तर अ‍ॅनिमेशन विभागात अमेरिका, इटली, झेक रिपब्लिक, इंग्लंड, भारत, स्लोव्हाकिया, फ्रान्स, स्वीडन, ब्राझील, रशिया या दहा देशांतील एकूण १६ चित्रपटांचा आस्वाद घेता येईल.
रात्री नऊ ते अकरा या वेळात चित्रपट दाखविणार
४नोकरदारांना त्यांच्या कार्यालयीन वेळांमुळे ‘पिफ’मधील चित्रपटांचा आस्वाद घेता येत नाही, अशा चित्रपटरसिकांना ते शक्य व्हावे यासाठी रात्री ९ ते ११ या वेळेतही एनएफएआयमध्ये चित्रपट दाखविले जाणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या कलाकृतीला जागतिक ओळख

उत्तम व्यासपीठ : लेखक, दिग्दर्शक, निर्मात्यांशी संवाद


पुणे : ‘पिफ’सारखे महोत्सव म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलाकृती सादरीकरणासाठीचे उत्तम व्यासपीठ. एखाद्या विशिष्ट दृष्टिकोनातून मेहनतीने साकारलेली कलाकृती जेव्हा प्रेक्षकांसमोर सादर होते, तेव्हा मनात थोडी भीती, हुरहुर आणि कुतूहल दाटलेले असते. जागतिक स्तरावर कलाकृतीला मिळालेली ओळख निश्चितच प्रेरणादायी ठरते, हे बोल आहेत कलात्मक शिक्षण घेणाऱ्या संस्थेतील विद्यार्थ्यांचे.
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) रसिक देश-विदेशातील चित्रपटांचा आस्वाद घेतात. ‘स्टुडंट विभागा’मध्ये कलात्मक शिक्षण देणाºया विविध संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या कलाकृती पाहण्याची संधीदेखील सिनेप्रेमींना मिळते. आपली कलाकृती या स्पर्धा विभागामध्ये निवडली जाणे, ही विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी गोष्ट असते. काही विद्यार्थ्यांशी ‘लोकमत’ने संवाद साधला असता महोत्सवात विद्यार्थ्यांच्या कलाकृतींना मिळणाºया व्यासपीठाबद्दल समाधान व्यक्त केले.
दिग्दर्शक नागनाथ खरात म्हणाला, ‘‘विद्यार्थी असो किंवा चित्रपट माध्यमाचे अधिकृत प्रशिक्षण न घेतलेली व्यक्ती असो, त्यांनी निर्मित केलेला मग तो लघुपट किंवा माहितीपट असो सार्वजनिक स्तरावर तो प्रदर्शित होत नाही.’’
एफटीआयआयचा माजी विद्यार्थी साई म्हणाला, महोत्सवांमुळे विद्यार्थ्यांच्या कलाकृतीची जागतिक स्तरावर ओळख निर्माण होते.

लघुपट स्पर्धा झाली बंद
‘पिफ’मध्ये दोन वर्षांपूर्वी पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) विविध स्थळांवर आधारित लघुपट स्पर्धा घेतली होती. ती स्पर्धा बंद झाल्याबद्दल स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा विजेता ठरलेला एफटीआयआयचा विद्यार्थी रमेश होलबोले याने खंत व्यक्त केली. यासारख्या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळाले, तर काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. त्यांच्या कामाचीही दखल घेतली जाते आणि चर्चा होते, असेही तो म्हणाला.

उच्च न्यायालयाच्या एका निकालामुळे महोत्सवांच्या आयोजनावर निर्बंध आले आहेत. महापालिकेऐवजी खासगी संस्थांच्या प्रयत्नांनी महोत्सव घेण्याविषयी चर्चा झाली होती. शहरात महोत्सवाला अत्यंत कमी प्रतिसाद मिळत असतो. त्यामुळे महोत्सवाच्या वाढीसाठी नियोजन गरजेचे आहे. पुढील वर्षी महोत्सवाचे काही महिने अगोदरच नियोजन केले जाईल. - श्रावण हर्डीकर, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

संस्कृती आणि सांस्कृतिक रक्षणाचे केवळ गोडवेच गाणारा पक्ष भाजपा आहे. महापालिकेत कलाविषयक जाण आणि भान असणाºया नेतृत्वाचा अभाव आहे. सत्ताधाºयांना केवळ टक्केवारीतच रस आहे. कोणालाही महोत्सव आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये रस नाही. प्रशासनाच्या अनास्थेमुळे महोत्सव होत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. - दत्ता साने, विरोधी पक्षनेते

सत्ताधाºयांना कला व साहित्यविषयक उपक्रमांचा विसर पडला आहे. आपली सांस्कृतिक ओळख वाढीला लागावी, यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही. सत्ताधारी आणि प्रशासनाच्या अनास्थेने हा महोत्सव यंदा होणार नाही. ही दुर्दैवाची बाब आहे.’’
- राहुल कलाटे, गटनेते शिवसेना

Web Title: The screen of 'PIF' will open tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.