महिला महोत्सवाला कात्री

By Admin | Published: February 8, 2015 12:02 AM2015-02-08T00:02:28+5:302015-02-08T00:02:28+5:30

समितीच्या सदस्यांना डावलण्यात आल्याने समितीची नाराजी दूर करण्यासाठी समितीनेच आणखी एका महिला महिला महोत्सवाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

Sculpture of the women's festival | महिला महोत्सवाला कात्री

महिला महोत्सवाला कात्री

googlenewsNext

पुणे : महापालिकेकडून नव्याने सुरू करण्यात आलेल्या महिला महोत्सवांच्या नियोजनात महिला आणि बाल कल्याण समितीच्या सदस्यांना डावलण्यात आल्याने समितीची नाराजी दूर करण्यासाठी समितीनेच आणखी एका महिला महिला महोत्सवाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. हा महोत्सव ८ मार्च रोजी प्रस्तावित करण्यात आला असताना, हा प्रस्ताव समितीने एक महिना पुढे ढकलला आहे. त्यामुळे हा महोत्सव होणार नसल्याचे जवळ जवळ स्पष्ट झाले आहे. एक महोत्सव असताना, हा दुसरा समितीची नाराजी दूर करण्यासाठी दुसऱ्या महोत्सवाचा घाट घातला जात असल्याची बाब ‘लोकमत’ने उजेडात आणल्यानंतर स्थायी समितीने हा निर्णय घेतला आहे.
पक्षनेत्यांच्या महोत्सवासाठी ३० लाखांचा खर्च येणार असताना, आता समितीकडून तब्बल ५० लाख रुपयांचा खर्च करून दोन दिवसांचा स्वतंत्र महिला सक्षमीकरण व प्रशिक्षण महोत्सव घेण्यात येणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर दाखल करण्यात आला होता. मात्र, मंगळवारी झालेल्या समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव एका महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे या प्रस्तावावर आता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत घेतला जाणार आहे. मात्र, त्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिली तरी, ८ मार्चपर्यंत त्याचे नियोजन करणे शक्य नसल्याने समितीच हा महोत्सव रद्द होणार असल्याचे महापालिका वर्तुळातून सांगण्यात येत आहे.

पालिकेची आर्थिक स्थिती हालाखीची असतानाही, महापालिकेच्या पक्षनेत्यांच्या पुढाकारने या व सुरू करण्यात आलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, मातोश्री रमाबाई आंबेडकर, रमाबाई रानडे, वीरमाता राणी लक्ष्मीबाई यांच्या नावाने या वर्षीपासून महिला महोत्सव घेण्यात येत आहे. या महोत्सवाच्या आयोजन समितीत महिला आणि बाल कल्याण समितीच्या एकाही सदस्यास न घेतल्याने, तसेच महिलांसाठी असलेल्या या महोत्सवाच्या कार्यक्रमांचे नियोजन महिलांना न विचारताच पक्षनेत्यांनी केल्याने या महोत्सवावर महिला आणि बाल कल्याण समितीने बहिष्कार टाकून व्यक्त केलेली नाराजी पुणेकरांना चांगलीच महागात
पडणार आहे.

Web Title: Sculpture of the women's festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.