लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले
By admin | Published: April 25, 2017 04:01 AM2017-04-25T04:01:06+5:302017-04-25T04:01:06+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पिंपरी-चिंचवड महापालिकेत लाच घेताना अधिकारी, कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडण्याची
पिंपरी : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पिंपरी-चिंचवड महापालिकेत लाच घेताना अधिकारी, कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडण्याची सव्वा महिन्यांत दुसरी कारवाई आहे. आयुक्तांच्या स्वीय सहायकला पकडल्याने महापालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इतिहासात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यापूर्वी महापालिकेत कारवाई केलेली नव्हती. सव्वा महिन्यांपूर्वी शिक्षणाधिकारी उत्तरा कांबळे यांना रंगेहात पकडले होते. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर कांबळे निलंबित केले होते.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राजीव जाधव यांची बदली करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जितील महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांची नियुक्ती पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी केली होती. त्यांनी महापालिका निवडणुकीत इच्छित असे काम केलेही. निवडणुकीनंतर त्यांनी मुंबईत बदलीसाठी मागणी केली होती. त्यानुसार शनिवारी राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून नागपूरचे श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती झाली. नवे आयुक्त बुधवारी रुजू होणार आहेत.