नीरा येथील कापड दुकान सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:11 AM2021-05-22T04:11:21+5:302021-05-22T04:11:21+5:30

ब्रेक द चैन अंतर्गत राज्य सरकारने गेली महिनाभर विविध निर्बंध लादत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त ...

Seal the cloth shop at Nira | नीरा येथील कापड दुकान सील

नीरा येथील कापड दुकान सील

Next

ब्रेक द चैन अंतर्गत राज्य सरकारने गेली महिनाभर विविध निर्बंध लादत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर अस्थापने बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. कापड दुकान हे अत्यावश्यक सेवेत येत नसताना सुद्धा नीरेतील भर बाजारपेठेतील अहिल्यादेवी होळकर चौकातील कापड दुकान सुरू ठेवणाऱ्या गुरु ड्रेसेस या कापड दुकानाच्या मालकावर पोलिसांनी कारवाई केली होती. गेल्या महिनाभरापासून कापड दुकानाचे मुख्य शटर उघडून खुलेआम कापड विक्री करत होता. त्यामुळे सोमवारी (१७ मे) नीरा दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपागर, आपत्ती व्यवस्थापन समितीचे सचिव तथा तलाठी बजरंग सोनवले, ग्रामसेवक मनोज डेरे, सहाय्यक फौजदार सुदर्शन होळकर, पोलीस नाईक राजेंद्र भापकर, पोलीस पो. का. हरिश्चंद्र करे, पोलीस पाटील राजेंद्र भास्कर, कोतवाल अप्पा लकडे यांनी या दुकानावर छापा टाकून या दुकानदारास कापड विक्री करीत असताना रंगेहाथ पकडले. दुकानदाराला ताब्यात घेतले व दुकान सील करण्याचा प्रस्ताव तहसीलदांना पाठविण्यात आला होता. तहसीलदारांनी प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविल्यावर त्यांच्या आदेशानुसार आज दुकान सील करण्यात आले.

ही कारवाई नीरेचे तलाठी बजरंग सोनवले, पोलीस पाटील राजंद्र भास्कर, पो. का. हरिश्चंद्र करे, कोतवाल अप्पा लकडे, ग्रामपंचायतीचे कर्मचारी सचिन ठोंबरे यांनी केली.

Web Title: Seal the cloth shop at Nira

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.