खराबवाडीत नियम न पाळणरे पाच दुकाने सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:12 AM2021-05-07T04:12:13+5:302021-05-07T04:12:13+5:30
चाकण : शासकीय नियमांचे पालन न करता या नियमांना हरताळ फासल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खराबवाडी ग्रामपंचायत प्रशासन ...
चाकण : शासकीय नियमांचे पालन न करता या नियमांना हरताळ फासल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खराबवाडी ग्रामपंचायत प्रशासन व कोरोना जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने खराबवाडी (ता. खेड) येथे करण्यात आलेल्या धडक कारवाईत प्रशासनाने पाच दुकानांना टाळे ठोकले. कोरोना नियमांचे उल्लंघन करणारे नागरिक व व्यावसायिक ग्रामपंचायत प्रशासनाच्या रडारवर आले आहेत. खराबवाडी ग्रामपंचायतीचे प्रशासन यासाठी अलर्ट झाले आहेत. ग्रामविकास अधिकारी आर.आर.चौरे, ग्रामपंचायत कर्मचारी अजित केसवड, तलाठी श्रीधर आचारी, पोलीस पाटील किरण कीर्ते, ग्रामपंचायातीचे कर्मचारी आदींच्या पथकाने बेडक ही कारवाई सुरु केली आहे. खराबवाडी हद्दीत वेळेपेक्षा जादा वेळ केशकर्तनालय, स्टेशनरी दुकाने, फ्रुट व भाजीपाल्याची दुकाने सुरु ठेवण्यात येत होती. अशा दुकानदारांकडून एकूण नऊ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर पाच दुकानांना टाळे ठोकण्यात आल्याचे आर.आर.चौरे व अजित केसवड यांनी सांगितले.