सिम्बायोसिस करंडकावर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाची मोहोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:10 AM2020-12-06T04:10:25+5:302020-12-06T04:10:25+5:30

उत्तेजनार्थ पारितोषिक विधी महाविद्यालयाच्या सडक या नाटकाला मिळाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये सुरू झाली नाहीत. मात्र ही स्पर्धा ऑनलाईन ...

Seal of Sinhagad Engineering College on Symbiosis Trophy | सिम्बायोसिस करंडकावर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाची मोहोर

सिम्बायोसिस करंडकावर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाची मोहोर

googlenewsNext

उत्तेजनार्थ पारितोषिक विधी महाविद्यालयाच्या सडक या नाटकाला मिळाले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये सुरू झाली नाहीत. मात्र ही स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आली होती. यंदा वीस महाविद्यालये सहभागी झाली होती.

दोन आणि तीन डिसेंबरला स्पर्धा पार पडली. यावेळी अभिनेते क्षितिष दाते आणि ओम भूतकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

शॉर्टकट आणि लॉंगकट नाटकाच्या गायत्री बाबर आणि मंगेश इंगोले यांना लेखन आणि दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक मिळाले आहे. निशिर डाक या नाटकाच्या तन्मय भिडे आणि गंधार जोशी यांना दिग्दर्शनाचे उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे.

फोन इन हेवन नाटकाच्या जयेश महामुनी आणि अंतर नाटकाच्या श्रीरंग पाठक, सौमित्र शेंडीकर यांना लेखनाची उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाली आहेत.

अंतर नाटकाच्या मयूर जोगळपुरे आणि सडक नाटकाच्या वेदवत्ती ठिपसे यांना अभिनयाचे पारितोषिक मिळाले आहे.

Web Title: Seal of Sinhagad Engineering College on Symbiosis Trophy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.