माळेगावच्या नगरपंचायतीवर शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:10 AM2021-04-01T04:10:19+5:302021-04-01T04:10:19+5:30

ऐन ग्रामपंचायत निवडणूकीच्या धामधुमीत नगर विकास सचिवाने तब्बल तीन वेळा नगरपंचायतची उद्षोषणा करण्यात आली होती. मात्र निवडणूक आयोगाकडून ठोस ...

Sealed on Nagar Panchayat of Malegaon | माळेगावच्या नगरपंचायतीवर शिक्कामोर्तब

माळेगावच्या नगरपंचायतीवर शिक्कामोर्तब

Next

ऐन ग्रामपंचायत निवडणूकीच्या धामधुमीत नगर विकास सचिवाने तब्बल तीन वेळा नगरपंचायतची उद्षोषणा करण्यात आली होती. मात्र निवडणूक आयोगाकडून ठोस निर्णय झाला नसल्याने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ७७ उमेदवारापैकी ७६ जणांनी सामूहिक अर्ज माघारी घेतल्याने ग्रामपंचायत निवडणूक होऊ शकली नाही. त्यामुळे गेली पाच महिने झाले ग्रामपंचायत की नगरपंचायत याबाबत चर्चांना उधाण आले होते. अखेर राज्याच्या नगर विकास उपसचिवांनी मा. राज्यपालांच्या आदेशानुसार माळेगाव ग्रामपंचायत रद्द करून नगरपंचायत जाहीर केल्याचे नोटिसीद्वारे प्रसिद्ध केले. दरम्यान नगरपंचायत बाबत नोटीस जाहीर होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राजहंस चौकात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. यावेळी माजी सभापती संजय भोसले, माजी सरपंच जयदीप तावरे, आप्पा बनसोडे, दादा जराड, इम्तियाज शेख, निखिल माने, प्रवीण जगताप, रणजित माकर, दयावान जराड, प्रीतम चव्हाण, युवराज जेधे, पप्पू भोसले, सोनू शेख उपस्थित होते. दरम्यान माळेगाव नगरपंचायतीची अंतिम रचना होत नाही तोपर्यंत नगरपंचायतीची कार्य व कर्तव्य पार पाडण्यासाठी बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केल्याचे उपसचिव मोघे यांनी पत्रात नमूद केले आहे.

फोटो ओळी : माळेगाव ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झाल्याने जल्लोष करताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते.

३१०३२०२१-बारामती-१०

Web Title: Sealed on Nagar Panchayat of Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.