बँक खाती सील केल्याने दूध उत्पादक, संस्था अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 01:40 AM2018-12-06T01:40:51+5:302018-12-06T01:40:59+5:30
सहकारी दूध संस्थांची बँकेतील खाती सील करून ठेवल्याने भोर तालुक्यातील अनेक दूध उत्पादक शेतकरी व सहकारी दूध संस्था अडचणीत आल्या आहेत.
भोर : शेतकऱ्यांची पीककर्जाची थकबाकी जमा करण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतक-यांची व सहकारी दूध संस्थांची बँकेतील खाती सील करून ठेवल्याने भोर तालुक्यातील अनेक दूध उत्पादक शेतकरी व सहकारी दूध संस्था अडचणीत आल्या आहेत. यामुळे शेतकरी बँकेच्या अन्यायकारक कारभाराबद्दलनाराजी व्यक्त करीत असून बँकेने हे थांबवले नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
भोर तालुक्यात ७५ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था असून या संस्थांच्या माध्यमातून सुमारे ६० हजारपेक्षा अधिक शेतकरी सभासद असून यातील ९० टक्के शेतकºयांनी विविध कार्यकारी संस्थेच्या माध्यमातून पीक कर्ज घेतले आहे, तर ४५ ते ५५ सहकारी दूध संस्था आहेत. मात्र राज्य शासनाने २०१७ पर्यंत शेतकºयांनी घेतलेले पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर अद्यापपर्यंत कोणताच निर्णय झाला नसून पीक कर्ज माफ केलेले नाही. त्यामुळे जिल्हा बँकेची कर्जवसुली थांबल्याने बँकेची थकबाकी वाढत चालली आहे. यामुळे जिल्हा बँकेच्या प्रशासनाने जिल्हा बँकेतील पीक कर्जाची थकबाकी असलेल्या दूध उत्पादक शेतकरी व सहकारी दूध संस्थांची खाती सील करून ठेवली आहेत.
>कर्जाची वसुली दूधसंकलनाच्यआ पैशातून
शेतकºयांनी कार्यकारी संस्थांकडून दूध पीक कर्ज घेतले आहे. मात्र, शासनाने २०१७ पर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केल्याने कर्जाची परतफेड झालेली नाही. जिल्हा बँकेच्या प्रशासनाने शेतकरी आणि दूध संस्थांची खाती सील केली आहेत. अनेक शेतकºयांची कुटुंबे दूधउद्योगावरच चालत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
>शेतकºयांच्या पीक कर्जाची वसुली त्यांच्या शेतीच्या किंवा इतर उत्पन्नातून घ्यावी. याची वसुली दूध उत्पादनातून आलेल्या पैशातून करण्यासाठी शेतकºयांची खाती सील करणे योग्य नाही, याबाबत उद्या जिल्हा बँकेच्या बैठकीत विषय मांडून शेतक ºयांना न्याय देऊ.
- संग्राम थोपटे, आमदार