दीडशे बेवारस मोटारसायकलपैकी ६५ मालकांचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:09 AM2021-04-11T04:09:56+5:302021-04-11T04:09:56+5:30
ओतूर : ओतूर ( ता. जुन्नर ) पोलीस ठाणे आवारात वर्षानुवर्षे धूळखात पडलेली दीडशेहून अधिक ...
ओतूर :
ओतूर ( ता. जुन्नर ) पोलीस ठाणे आवारात वर्षानुवर्षे धूळखात पडलेली दीडशेहून अधिक बेवारस वाहने धूळखात पडलेली आहेत. त्यातील ६५ वाहनमालकांचा शोध घेण्यात पोलिस व येथील गंगामाता वाहन शोध संस्थेला यश मिळाले असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी केले.
शेकडो वाहने विविध गुन्ह्यांत जप्त करतात परंतु न्यायालयीन प्रक्रियेमुळे बेवारस वाहनांचे मालक मिळून येत नाहीत त्यामुळे शेकडो बेवारस वाहने वर्षानुवर्षे मालकाच्या प्रतीक्षेत पडून राहतात. ओतूर पोलीस ठाण्याच्या आवारातही अशी सुमारे दीडशे वाहने वर्षानुवर्षे धूळखात पडलेली बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेऊन ते त्यांना कायदेशीर प्रक्रिया पार पाडत परत करणे हे पोलिसांच्या असंख्य व्यापापैकी एक महत्वाचे व तितकेच वेळखाऊ काम होते. त्यासाठी येथील गंगामाता वाहन शोध संस्थेचे पोलिसांनी सहकार्य घेतले. ओतूर पोलीस ठाणे आवारात धूळखात पडलेल्या वाहनाची चासी नंबर, इंजिन नं.वरुन धूळखात पडलेल्या अनेक बेवारस वाहनांपैकी ६५ वाहन मालकांचा तपास संस्थेने लावला.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक विवेक पाटील, जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, पोलीस उपनिरीक्षक ए. के. शेळके मुद्देमाल कारकून टी. डी. दाते, मुद्देमाल मदतनीस पोलीस नाईक डी. एल. किर्वे व गंगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत, उपाध्यक्ष बाबासाहेब बागड, प्रल्हाद म्हस्के यांनी केली.
--
चौकट
पंधरा दिवसांत वाहन न नेल्यास त्याला लिलाव
शोध लागलेल्या वाहनांची नोंदणी क्रमांक, वाहनाचा प्रकार चासी नं., इंजिन नंबर, वाहन मालकाचे नाव, पत्ता यांची यादी ओतूर पोलीस ठाण्यात लावण्यात आली आहे. या यादीमध्ये आपले वाहन / नाव असल्यास त्या वाहन मालकांनी ओळख पटवून आपले वाहने घेऊन जावीत संबंधीत मालकांनी १५ दिवसांत वाहन न नेल्यास ते वाहन बेवारस समजून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सदर वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे, अशी माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. एच.कांबळे यांनी सांगितले.
--
फोटो क्रमांक : १०ओतूर बेवारस फोटो
सोबत फोटो - बेवारस वाहनमालकांचा शोधपथकातील पोलीस अधिकारी पो. कर्मचारी बेवारस वाहने.