घोडेगाव पोलीस ठाण्यातील बेवारस वाहनमालकांचा लागला शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:10 AM2021-05-20T04:10:27+5:302021-05-20T04:10:27+5:30

पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या आदेशान्वये अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंभाते यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगाव ...

Search for unsuspecting vehicle owners at Ghodegaon police station | घोडेगाव पोलीस ठाण्यातील बेवारस वाहनमालकांचा लागला शोध

घोडेगाव पोलीस ठाण्यातील बेवारस वाहनमालकांचा लागला शोध

Next

पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या आदेशान्वये अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंभाते यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगाव पोलीस ठाण्याच्या आवारात धूळ खात पडलेल्या ३० वाहनांच्या चासी नंबर व इंजिन नंबरवरून २५ वाहनांचा घोडेगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी व मावळ तालुक्यातील परंदवाडी येथील गंगामाता वाहन शोध संस्थेच्या मदतीने मूळ मालकांचा शोध लावला आहे. मूळ मालकांचा शोध घेण्यास सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, पोलीस हवालदार बाळासाहेब पवार, संदीप लांडे, दत्तात्रय जढर, दीपक काशिद, आतिश काळे, अमोल काळे, होमगार्ड स्वप्निल कानडे, आदेश शेळके, गंगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत, उपाध्यक्ष बाबासाहेब बागडे, भारत वाघ, प्रल्हाद म्हस्के यांना यश आले आहे.

चौकट

शोध लागलेल्या वाहनांच्या मालकांशी संपर्क साधलेला आहे. मालकांनी वाहनांची योग्य ती कागदपत्रे, पत्ता, आयकार्ड फोटो, आधारकार्ड आदी कागदपत्रे दाखवून पंधरा दिवसांत ती घेऊन जावीत. वाहने घेऊन न गेल्यास ती बेवारस समजून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून वाहनांचा लवकरच लिलाव करण्यात येणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी सांगितले.

घोडेगाव पोलीस ठाण्यात तीन वर्षे बेवारस पडलेले मंगेश आर्विकर यांचे वाहन त्यांना पुन्हा ताब्यात देताना प्रदीप पवार व इतर कर्मचारी.

Web Title: Search for unsuspecting vehicle owners at Ghodegaon police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.