नारायणगाव उपबाजार केंद्रात टोमॅटोला हंगामातील उच्चांकी दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:10 AM2021-07-26T04:10:20+5:302021-07-26T04:10:20+5:30
राज्यातील टोमॅटोचे मुख्य मार्केट म्हणून जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख असून या ठिकाणी पुणे सह अहमदनगर , बीड ...
राज्यातील टोमॅटोचे मुख्य मार्केट म्हणून जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख असून या ठिकाणी पुणे सह अहमदनगर , बीड जिल्ह्यातील शेतकरी टोमॅटो विक्री साठी आणतात . या उपकेंद्रात सरासरी वार्षिक २०० कोटीची उलाढाल होत आहे . परंतु करोना मुळे गेली दीड वर्षांपासून बाजार समिती व शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे . सभापती संजय काळे यांनी कोरोना काळातही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून बाजार समितीची तालुक्यातील सर्व केंद्रे सुरु ठेवली होती . त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता . भाजीपाला ,टोमॅटो ,कांदा ,बटाटा आदी शेतीमालाची अवाक जावक साठी मार्केट सुरु ठेवल्याने काही विरोधकांनी टीका केली होती.
या उपबाजार केंद्रात टोमॅटो , कोथबीर , मेथी यांची मोठी उलाढाल होते . मार्च ,एप्रिल पासून टोमॅटो हंगामाला सुरुवात होऊन येथील टोमॅटो भारतातील भोपाळ , मध्यप्रदेश ,दिल्ली ,हरियाणा ,राजस्थान ,गुजरात ,आग्रा आदी राज्यासह मुंबई ,पुणे आदी भागात जातात .
मागील वर्षी एप्रिल २०२० ते मार्च २०२१ पर्यंत उपबाजार केंद्रातून ३५ लाख ३५ हजार ७७५ टोमॅटो क्रेटची आवक होऊन १०६ कोटी ४१ लाख ६१ हजार ६४५ रुपयांची सरासरी आर्थिक उलाढाल होऊन ५० ते १ हजार १०० रुपये २० किलो क्रेट बाजारभाव मिळाला होता .
यंदा एप्रिल २०२१ ते २५ जुलै २०२१ पर्यंत उपबाजार केंद्रातून २६ लाख १७ हजार ६४५ टोमॅटो क्रेटची आवक होऊन कोटी लाख हजार रुपयांची सरासरी आर्थिक उलाढाल होऊन २० किलोच्या प्रती क्रेट ५० ते ५०० रुपये बाजारभाव मिळत आहे .
सभापती संजय काळे म्हणाले कि, नारायणगाव उपबाजार केंद्रात टोमॅटोची सुमारे २०० कोटीच्या पुढे उलाढाल होते . गेल्यावर्षी करोना व निसर्ग चक्री वादळ, अवकाळी पाऊस यामुळे टोमॅटो हंगाम व आर्थिक उलाढालीवर मोठया प्रमाणात परिणाम होत आहे. बाजार समितीमध्ये प्राधान्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचा त्यानंतर आडतदार ,व्यापारी यांचा विचार केला जातो.
एप्रिल २०२१ पासून ची उलाढाल
एप्रिल २०२१ या महिन्यात १ लाख ८ हजार १४५ क्रेटची आवक , ५० ते २५० रुपये २० किलो क्रेट बाजारभाव , १७ कोटी ३९ लाख ६ हजार ५०० रुपयांची उलाढाल
मे २०२१ या महिन्यात २ लाख ३२ हजार ७७० क्रेटची आवक झाली. ५० ते २७५ रुपये २० किलो क्रेट बाजारभाव . २९ कोटी ९३ लाख ८ हजार ४० रुपयांची उलाढाल झाली .
जुन २०२१ या महिन्यात ७ लाख ८१ हजार ३५ क्रेटची आवक झाली. ५० ते २२५ रुपये २० किलो क्रेट बाजारभाव .या ८१ कोटी ८४ लाख १ हजार ७२५ रुपयांची उलाढाल झाली.
जुलै २०२१ या महिन्यात २५ जुलै पर्यंत १४ लाख ९५ हजार ६४५ क्रेटची आवक झाली. १०० ते ५०० रुपये २० किलो क्रेट बाजारभाव .या ६५ कोटी ४४ लाख ११ हजार २५० रुपयांची उलाढाल झाली
.
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार केंद्रात टोमॅटो क्रेटची खरेदी करताना व्यापारी