Set Exam Result 2024: एसईबीसी आरक्षणासह सेटचा निकाल जाहीर होणार
By प्रशांत बिडवे | Updated: July 30, 2024 17:47 IST2024-07-30T17:47:40+5:302024-07-30T17:47:53+5:30
महाराष्ट्र शासनाकडून मार्गदर्शक सूचना मिळताच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यांत सेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येईल

Set Exam Result 2024: एसईबीसी आरक्षणासह सेटचा निकाल जाहीर होणार
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राज्य पात्रता परीक्षा सेट विभागाच्या वतीने दि. ७ एप्रिल रोजी ३९व्या सेट परीक्षेचे आयाेजन केले हाेते. यात एसईबीसी आरक्षणाचा अंतर्भाव करीत सेट परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
दरम्यान, यात एसईबीसी प्रवर्गासाठी आरक्षण लागू करावे किंवा कसे? याबाबत सेट परीक्षा विभागातर्फे राज्य सरकारसाेबत पत्रव्यवहार करण्यात आला हाेता. तसेच नव्याने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी आरक्षण अधिनियम, २०२४ एसईबीसी प्रवर्गात समाविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांकडून त्यांच्या प्रवर्गाची माहिती विभागाकडून ऑनलाइन मागविण्यात आली.
एसईबीसी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांच्या आरक्षणाबाबत महाराष्ट्र शासनाकडून मार्गदर्शक सूचना मिळताच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यांत सेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येईल, अशी माहिती विभागातर्फे देण्यात आली. सहायक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी दि. ७ एप्रिल राेजी आयाेजित राज्य पात्रता परीक्षा यंदा तब्बल १ लाख ९ हजार १५४ विद्यार्थ्यांनी दिली हाेती. एसईबीसी आरक्षणाचा अंतर्भाव करण्यावरून तब्बल चार महिन्यांपासून रखडलेला सेट परीक्षेचा निकाल लागणार आहे.