सलग दुसऱ्या वर्षीही बारावीचा टक्का घसरला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 06:40 AM2019-05-29T06:40:40+5:302019-05-29T06:59:04+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी/मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल ८५.८८ टक्के लागला.

For the second consecutive year, the HSC decreased | सलग दुसऱ्या वर्षीही बारावीचा टक्का घसरला

सलग दुसऱ्या वर्षीही बारावीचा टक्का घसरला

Next

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी/मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल ८५.८८ टक्के लागला. सलग दुसºया वर्षी निकालाचा टक्का घसरला आहे. त्याचबरोबर ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाºया विद्यार्थ्यांच्या संख्येतही २० टक्क्यांनी घट झाली आहे.
बारावीच्या निकालात मुंबई विभागीय मंडळातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचीही संख्या घटली आहे. यंदा मुंबईचा एकूण निकाल ८३.८५ टक्के लागला आहे. गेल्या वर्षी तो ८७.४४ टक्के इतका होता. मात्र मुंबईतील सर्वाधिक तब्बल २,२१० विद्यार्थी हे नव्वदीपार असल्याची माहिती मुंबई विभागीय मंडळाकडून जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील नव्वदीपार असलेल्या एकूण ४,४७० विद्यार्थ्यांपैकी जवळपास ५० टक्के विद्यार्थी मुंबईतील आहेत.
सीबीएसई, आयसीएसई व इतर बोर्डांच्या विद्यार्थ्यांना मिळणाºया गुणांचा टक्का वेगाने वाढत असताना एचएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या गुणांचा टक्का घटत आहे. त्यामुळे बारावीच्या गुणांवर प्रवेश मिळणाºया अभ्यासक्रमांसाठी एचएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मोठी स्पर्धा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यभरातून कला, वाणिज्य, विज्ञान व व्यवसाय अभ्यासक्रमाचे एकूण १४,२१,९३६ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी १२,२१,१५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीचा निकाल २०१७ मध्ये ८९.५० टक्के लागला होता. २०१८ मध्ये त्यात घट होऊन ८८.४१ टक्के इतका लागला, त्यानंतर आता सलग दुसऱ्यांदा निकाल ३ टक्क्यांनी घट झाली. २०१८ मध्ये राज्यभरात ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाºयांची संख्या ५,४८६ इतकी होती, यंदा ४,४७० विद्यार्थ्यांना ही मजल मारता आली. तसेच यंदा ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाºया विद्यार्थ्यांची संख्याही केवळ १,०२,५५२ इतकी आहे. निकालात मुलींनी बाजी मारण्याची परंपरा यंदाही कायम राहिली आहे. विद्यार्थिनींचा ९०.२५ टक्के तर विद्यार्थ्यांचा निकाल ८२.४० टक्के इतका आहे. विभागनिहाय निकालामध्ये यंदाही कोकण विभाग अव्वल ठरले आहे तर नागपूर विभाग शेवटच्या क्रमांकावर राहिले आहे. पुणे विभागाचा निकाल ८७.८८ टक्के इतका लागला आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता निकाल घोषित केला. मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यावेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता आॅनलाइन निकाल उपलब्ध करून देण्यात आला.
> कोकणची बाजी
१. निकालात मुलींनी बाजी
मारण्याची परंपरा यंदाही कायम
२. कोकण पुन्हा अव्वल तर नागपूर विभाग शेवटच्या क्रमांकावर
३. दिव्यांग विद्यार्थ्यांचा
निकाल ९२.६० टक्के
५. एकूण १५१ विषयांपैकी २२ विषयांचा निकाल १०० टक्के
६. आयपॅडवर परीक्षा देण्याची प्रथमच संधी दिलेल्या मुंबईची दिव्यांग निशिकाला ७३ टक्के
>लक्ष ‘नीट’, ‘जेईई’कडे
बारावी विज्ञानच्या प्रश्नपत्रिकांचे बदललेले स्वरूप, काठिण्य पातळीतील वाढ आणि विद्यार्थ्यांचे नीट, जईईकडेच असलेले लक्ष यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा विज्ञान शाखेचा निकाल ३.२५ टक्क्यांनी कमी लागला आहे. तुलनेने कला, वाणिज्यची घसरण कमी आहे.

Web Title: For the second consecutive year, the HSC decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.