उजनीतून सोलापूरच्या पिण्यासाठी पाण्याचे दुसरे आवर्तन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 03:15 PM2022-04-23T15:15:00+5:302022-04-23T15:15:02+5:30

धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदीपात्रात विसर्ग

second cycle of drinking water from Ujani dam to solapur started | उजनीतून सोलापूरच्या पिण्यासाठी पाण्याचे दुसरे आवर्तन सुरू

उजनीतून सोलापूरच्या पिण्यासाठी पाण्याचे दुसरे आवर्तन सुरू

Next

इंदापूर (पुणे) : महाराष्ट्रात पाणी साठवण क्षमतेने सर्वात मोठे असलेल्या उजनी धरणातूनसोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना पिण्यासाठी पाण्याचे दुसरे उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे. सोलापूरसाठीउजनी धरणातून १६ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता पाणी विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यासाठी धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदीपात्रात ५ हजार ४०० क्युसेक व पावर हाऊसमधून १ हजार ६०० क्युसेक असा एकूण ७ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती उजनी पाटबंधारे कार्यकारी अभियंता आर. पी. मोरे यांनी दिली.

सोलापूरात उष्णतेचा पारा ४२ अंश पार झाला असल्याने उन्हाच्या झळा आग ओकत आहेत. उष्णतेमुळे सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांना बाहेर फिरणे अवघड झाले आहे. उजनी धरण यावर्षी पूर्ण क्षमतेने भरले होते. पावसाळा संपल्यानंतर अवकाळी पावसाने उजनी धरण परिसर व सोलापूर भागात अनेकदा जोरदार हजेरी लावल्याने पूर्ण उन्हाळा संपेपर्यंत सोलापूरकरांना पाण्याची कसलीही कमतरता भासणार नसल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले. धरणातून सोलापूरसाठी एकूण ८.५ टीएमसी इतके पाणी सोडण्यात येत आहे. आणखी सात ते आठ दिवस पाणी विसर्ग सुरू राहणार आहेत. धरणाचे सात दरवाजे उघडले आहेत.

सध्या उजनी धरणाची पाणीपातळी ही ४९३.९३० मीटर इतकी आहे. धरणात उपयुक्त पाणीसाठा २३ टीएमसी इतका आहे. उजणी धरणात एकूण ४३.२९ टक्के इतका पाणीसाठा आहे. सध्या धरणातून स्लिपवेल ५ हजार ४०० क्युसेक, पावर हाऊस १ हजार ६०० क्युसेक, सीन- माढा बोगदा २९६ क्युसेक, दहिगाव एलआयएस ८८ क्युसेक, बोगदा ९०० क्युसेक, मुख्य कालवा ३ हजार क्युसेकने पाणी विसर्ग सुरू आहे. उजनीतून एकूण ११ हजार २८४ क्युसेकने पाणी विसर्ग सुरू आहे. उन्हाळी आवर्तनामुळे सोलापूर, अ. नगर परिसराला ऐन उन्हाळ्यात मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने उजनीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या उजनी खालच्या पट्यातील शेतकरी व नागरिकांमध्ये आनंदी वातावरण दिसून येत आहे. सोलापूरसाठी उन्हाळा संपेपर्यंत पाण्याची कसलीही कमतरता भासू देणार नाही, असे जलसपंदा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

Web Title: second cycle of drinking water from Ujani dam to solapur started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.