लसीकरणाचा दुसरा दिवसही गोंधळ आणि गर्दी आठ केंद्रे : दिवसभरात ५६० जणांना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:16 AM2021-03-04T04:16:02+5:302021-03-04T04:16:02+5:30
कोरोना प्रसार रोखण्यासाठी शारीरिक अंतर राखण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे. लसीकरणासाठी नेमून दिलेल्या केंद्रांवर मात्र गर्दी झाल्याने फिजिकल ...
कोरोना प्रसार रोखण्यासाठी शारीरिक अंतर राखण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे. लसीकरणासाठी नेमून दिलेल्या केंद्रांवर मात्र गर्दी झाल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. गर्दीचे नियोजन करताना कर्मचा-यांच्या नाकी नऊ येत होते. दुपारनंतर गर्दी काहीशी कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
केंद्र शासनाने जाहीर केलेल्या यादीतील खासगी रुग्णालयांमध्ये दुस-या दिवशीही लसीकरण सुरू झाले नव्हते. कोविन अॅपवर खासगी रुग्णालयांची यादी उपलब्ध आहे. त्यामुळे त्या रुग्णालयांमध्येही ज्येष्ठ नागरिकांनी दिवसभर लसीकरणासाठी विचारणा केली. मात्र, शासनाकडून कोणत्याही सूचना किंवा लसींचे डोस न आल्याने पुढील दोन दिवस लसीकरण सुरू होणार नसल्याचे सांगण्यात आले.
-----------------
खासगी रुग्णालयांमध्ये एक डोस २५० रुपयांना
प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि केंद्र शासनाच्या आरोग्य योजनेअंतर्गत येणा-या खासगी रुग्णालयांमध्ये २५० रुपयांमध्ये लस उपलब्ध होणार आहे. दोन डोसचे मिळून ५०० रुपये खर्च येणार आहे. केंद्र शासनाच्या यादीत समाविष्ट असलेल्या खासगी रुग्णालयांना शासनाकडून प्रत्येक डोस १५० रुपयांना दिला जाणार आहे. डोस मिळाल्यानंतर रुग्णालयांनी ती रक्कम ‘नॅशनल हेल्थ आॅथॉरिटी कोव्हिड व्हॅक्सिनेशन’ या खात्याच्या बँकेत जमा करावे लागणार आहेत. प्रत्येक डोससाठी खासगी रुग्णालयांना १०० रुपये सर्व्हिस चार्ज आकारण्याची मुभा देण्यात आली आहे. डोसची किंमत १५० रुपये आणि सर्व्हिस चार्ज १०० रुपये असे एका डोसचे २५० रुपये नागरिकांकडून आकारले जाणार आहेत. म्हणजेच दोन डोसचा मिळून ५०० रुपये इतका खर्च येईल.
----------------------------------
२ मार्च रोजी झालेले लसीकरण :
केंद्र ज्येष्ठ नागरिकव्याधीग्रस्त
सुतार दवाखाना ९९ १
कमला नेहरू हॉस्पिटल १०८ १४
ससून रुग्णालय १५८ ७
राजीव गांधी रुग्णालय ८२ २
मालती काची रुग्णालय ३० ०
शिवशंकर पोटे रुग्णालय ४१ १
बिंदूमाधव रुग्णालय ११ १
बारटक्के रुग्णालय ५ ०
------------------------------------------------------