कोव्हॅक्सिनचे दुसरे डोस ४१ केंद्रांवरच उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:11 AM2021-04-27T04:11:31+5:302021-04-27T04:11:31+5:30
पुणे : राज्य शासनाच्या आदेशानुसार नव्याने कोव्हॅक्सिन लस देणे बंद करण्यात आले असून, सध्या सर्व केंद्रांवर पहिला डोस घेणाऱ्या ...
पुणे : राज्य शासनाच्या आदेशानुसार नव्याने कोव्हॅक्सिन लस देणे बंद करण्यात आले असून, सध्या सर्व केंद्रांवर पहिला डोस घेणाऱ्या व्यक्तींना केवळ कोविशिल्ड लसच देण्यात येत आहे. मात्र ज्या नागरिकांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे, अशा नागरिकांसाठी कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस राखीव ठेवण्यात आला आहे.
महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सुर्यकांत देवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील महापालिकेच्या १६ व खाजगी रुग्णालयांच्या २५ अशा ४१ केंद्रांवर कोव्हॅक्सिनचे डोस उपलब्ध आहेत. कोविन अॅपमधील नोंदीनुसार सदर लस घेणाऱ्यांना दुसरा डोस सदर ठिकाणी दिला जात आहे. महापालिकेला राज्य शासनाकडून २५ एप्रिलपर्यंत कोव्हॅक्सिनचे १ लाख ८ हजार १५० डोस प्राप्त झाले आहेत. यापैकी साधारणत: ६० हजार जणांना कोव्हॅक्सिनचे डोस दिले गेले आहेत. त्यामुळे उर्वरित डोस सदर ४१ केंद्रांना वितरीत करण्यात आलेले असून, कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस त्यांना इतरत्र दुसऱ्या केंद्रांवर म्हणजेच १४१ केंद्रावर मिळणार नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी प्रथम कोव्हॅक्सिनचा डोस घेतला होता तेथेच दुसरा डोस उपलब्ध आहे.
---------------------