मराठा क्रांती मोर्चाचे दुसरे पर्व २९ जूनपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 04:21 AM2018-06-17T04:21:02+5:302018-06-17T04:21:02+5:30
मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा महिन्यांपूर्वी दिले होते.
पिंपरी (पुणे) : मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा महिन्यांपूर्वी दिले होते. मात्र, मागील दहा महिन्यांत कोणतीही ठोस कार्यवाही सरकारकडून झालेली नाही. सरकारला जागे करण्यासाठी २९ जूनला तुळजापूरमध्ये जागरण गोंधळ घालून मराठा क्रांती मोर्चाचे दुसरे पर्व सुरू करण्यात येईल. तसेच यापुढे मूक मोर्चा नाही, तर ठोक मोर्चा असेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
आरक्षण, शेतकरी कर्जमाफी, कोपर्डी प्रकरण, शिवस्मारक यासह (कै.) अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अनुदानाचे काय झाले? आदी प्रश्न महाराष्ट्रातील सकल मराठा समाज विचारत आहे. याची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी द्यावीत, अशी मागणी या वेळी करण्यात आली.