दौंड शुगरचा शंभर रुपयेचा दुसरा हप्ता जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:08 AM2021-06-18T04:08:33+5:302021-06-18T04:08:33+5:30
दौड शुगर कारखान्याचा गळीत हंगाम सन २०२०-२१ मधील ऊस बिलाचा दुसरा हप्ता शंभर रुपये प्रति मेट्रिक टनाप्रमाणे बँकेमध्ये संबंधित ...
दौड शुगर कारखान्याचा गळीत हंगाम सन २०२०-२१ मधील ऊस बिलाचा दुसरा हप्ता शंभर रुपये प्रति मेट्रिक टनाप्रमाणे बँकेमध्ये संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केला असल्याची माहिती कारखान्याचे संचालक वीरधवल जगदाळे यांनी सांगितले. २०२०-२१ च्या गळीत हंगामात कारखान्याने ११ लाख ३२ हजार १०२ मेट्रिक टन विक्रमी ऊस गाळप करून १२ लाख २८ हजार ३०० क्विंटल साखर पोती तयार केली आहेत. कारखान्याने यापूर्वी गाळप झालेल्या उसाचे प्रथम हप्त्याची रक्कम रुपये २५०० रुपये प्रति मेट्रिक टनाप्रमाणे अदा केलेली आहे. तर नुकतेच १०० रुपये प्रति मेट्रिक टनाप्रमाणे ११ कोटी ३२ लाख १० हजार रुपये बँकेत वर्ग करण्यात आले आहे. आज अखेर कारखान्याने २६०० रुपये प्रति मेट्रिक टनाप्रमाणे उसाचे पेमेंट अदा केलेले आहे. साखर विक्री परिस्थितीचा अंदाज घेऊन उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात येईल, असे वीरधवल जगदाळे यांनी सांगितले.
कारखान्याचे चालू हंगामातील लागवड धोरण जाहीर केले आहे. १५ जून २०२१ पासून ऊसनोंदी घेण्याचे काम चालू आहे. यावर्षी ऊस लागवडीचे नियोजन १५ दिवस आधी केलेले असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कारखाना धोरणाप्रमाणे लागणीचे नियोजन करावे.
कारखान्यामार्फत ऊस उत्पादन वाढीच्या दृष्टीने ठिंबक सिंचन योजना, उधारीने कंपोस्ट खत वाटप, बेणे मळ्यासाठी मूलभूत ऊस बेणे वाटप, माती परीक्षण सुविधा ई.योजना राबवण्यात येत असून सर्व शेतकरी बंधूंनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन संचालक शहाजी गायकवाड यांनी केले.