दुसऱ्या कोविड हॉस्पिटलची महापौर व आयुक्तांनी केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:09 AM2021-04-24T04:09:38+5:302021-04-24T04:09:38+5:30

पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून बाणेर सर्व्हे नं. ३३ येथे दुसऱ्या कोविड हॉस्पिटलचे काम अंतिम टप्प्यात आहे. या इमारतीची पाहणी महापौर ...

The second Kovid Hospital was inspected by the Mayor and Commissioner | दुसऱ्या कोविड हॉस्पिटलची महापौर व आयुक्तांनी केली पाहणी

दुसऱ्या कोविड हॉस्पिटलची महापौर व आयुक्तांनी केली पाहणी

Next

पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून बाणेर सर्व्हे नं. ३३ येथे दुसऱ्या कोविड हॉस्पिटलचे काम अंतिम टप्प्यात आहे. या इमारतीची पाहणी

महापौर मुरलीधर मोहळ, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, सभागृह नेते गणेश बिडकर, शहर अभियंता वाघमारे, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, नगरसेवक बाबूराव चांदेरे, आशिष मालपाणी यांनी केली.

एक महिन्याच्या आत या हॅास्पिटलचे काम पूर्ण होणार आहे. तसेच, यामध्ये सुमारे १५० ऑक्सिजन बेड व ५० आय.सी.यू. बेड अशा सुमारे २०० बेडची सुविधा याठिकाणी नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे.

सदर कोविड हॉस्पिटलचे काम महापौर निधीतून व सी.एस.आर. फंडातून होत आहे. सद्य:परिस्थिती पाहता बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, पंचवटी, सुस, म्हाळुंगे या भागातील नागरिकांना तसेच शहराच्या इतर भागातील नागरिकांना ही एक दिलासादायक बाब आहे.

Web Title: The second Kovid Hospital was inspected by the Mayor and Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.