प्रेमसुख कटारिया यांच्यावर बलत्काराचा दुसरा गुन्हा दाखल

By admin | Published: August 28, 2014 11:52 PM2014-08-28T23:52:46+5:302014-08-28T23:53:14+5:30

गेल्याच महिन्यात एका महिलेने बलात्काराची तक्रार दाखल केल्याने अडचणीत सापडलेले दौंडचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांच्यावर यवत येथील आणखी एका महिलने बलात्काराचा आरोप केला आहे

The second offense against Ruksuk Kataria has been registered | प्रेमसुख कटारिया यांच्यावर बलत्काराचा दुसरा गुन्हा दाखल

प्रेमसुख कटारिया यांच्यावर बलत्काराचा दुसरा गुन्हा दाखल

Next

दौंड : गेल्याच महिन्यात एका महिलेने बलात्काराची तक्रार दाखल केल्याने अडचणीत सापडलेले दौंडचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांच्यावर यवत येथील आणखी एका महिलने बलात्काराचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलीसांनी गुन्हाही दाखल केला आहे.
त्याचबरोबर उपनगराध्यक्ष योगेश कटारिया, नगरसेवक प्रमोद देशमुख, नगरसेवक राजु बारवकर, अल्हाद पासलकर, प्रकाश भालेराव, नगराध्यक्षा अंकुशाबाई शिंदे यांचे चिरंजीव (चिरंजीवचे नाव माहीत नाही) यांच्यासह ५ ते ६ जणांवर विनयभंग, अपहरण, मारहाण आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरिक्षक सजन हंकारे यांनी दिली. यवत (ता. दौंड) येथे राहणाऱ्या एका ४0 वर्षीय महिलेने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. २00७ पासून वेळोवेळी
शेठ ज्योतीप्रसाद विद्यालयाचे आॅफिस, दौंड येथील एस्सार पेट्रोल पंप यासह अन्य ठिकाणी प्रेमसुख कटारिया यांनी माझ्यावर बलत्कार केला. तसेच विद्यमान उपनगराध्यक्ष योगेश कटारिया, नगरसेवक प्रमोद देशमुख, नगरसेवक राजु बारवकर, अल्हाद पासलकर, प्रकाश भालेराव, नगराध्यक्षा अंकुशाबाई शिंदे यांचे चिरंजीव व अन्य ५ ते ६ महिला यांनी मला दौंड येथील एस्सार पेट्रोल पंपा जवळ वरील व्यक्तींनी शनिवार (दि. १६) रोजी सायंकाळी ४ वाजता बोलवले.त्यानंतर मला रिक्षात बसवून माझे अपहरण केले त्यानंतर मला व माझ्या मुलांना जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादित म्हटले आहे. (वार्ताहर)

Web Title: The second offense against Ruksuk Kataria has been registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.