दुसऱ्या फेरीची सोडत रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 03:52 AM2018-04-30T03:52:12+5:302018-04-30T03:52:12+5:30
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) येत्या शैक्षणिक वर्षासाठी शाळांच्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पहिली फेरी संपून बराच कालावधी उलटला अद्याप पुणे जिल्हयाच्या दुसºया फेरीतील प्रवेशाची सोडत काढण्यात आलेली नाही.
पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) येत्या शैक्षणिक वर्षासाठी शाळांच्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पहिली फेरी संपून बराच कालावधी उलटला अद्याप पुणे जिल्हयाच्या दुसºया फेरीतील प्रवेशाची सोडत काढण्यात आलेली नाही. आरटीई प्रवेशास विलंब होत असतानाच इतर शाळांमधील प्रवेश हाऊसफुल होऊ लागल्यामुळे पाल्यांच्या प्रवेशाचे काय करायचे याची चिंता पालकांना सतावू लागली आहे.
आरटीई अंतर्गत मर्यादित विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. आरटीईचा प्रवेश लॉटरी पध्दतीने सोडत काढून निश्चित केला जातो. यामध्ये प्रवेशासाठी नंबर न लागल्यास पालकांना त्यांच्या मुलांसाठी दुसºया शाळेत प्रवेश घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे आरटीई प्रवेशाची दुसरी सोडत जाहीर होण्याकडे ते डोळे लावून बसले आहेत. मात्र शिक्षण विभागाच्या निष्क्रियतेमुळे दुसºया फेरी सोडत रखडली आहे.
राज्यभरातील पुणे वगळता बहुतांश जिल्हयामध्ये आरटीईच्या दुसºया फेरीतील प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. पुणे जिल्हयातील आरटीईच्या पहिल्या फेरीमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास ८६ शाळांनी नकार दिला आहे, त्यामुळे पुणे जिल्हयातील दुसºया फेरीची प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. या शाळांविरूध्द आरटीई कायद्यातील तरतुदीनुसार प्राथमिक विभागाच्या शिक्षण संचालकांकडून कारवाई
केली जाणे आवश्यक आहे. मात्र त्यांच्याकडून यास चालढकल
केली जात आहे. प्रवेश नाकारणाºया शाळांवर काहीच कारवाई
होत नसल्याने त्यांची मनमानी वाढली आहे.
पुणे जिल्हयातील आरटीईच्या दुसºया फेरीचे प्रवेश मात्र शनिवारी जाहीर झाले नाहीत.
शिक्षण विभागाकडून मिळेना माहिती
पुणे जिल्हयातील आरटीईच्या दुसºया फेरीची सोडत कधी जाहीर करण्यात येणार आहे याबाबत शिक्षण विभागाकडून पालकांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पालकांकडून शिक्षणाधिकारी तसेच शिक्षण संचालक कार्यालयात चौकशी केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या आहेत.