दुसऱ्या विशेष फेरीत २८०० प्रवेश
By admin | Published: August 21, 2016 06:27 AM2016-08-21T06:27:31+5:302016-08-21T06:27:31+5:30
इयत्ता अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या विशेष फेरीत २ हजार ८८८ विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. या फेरीत एकूण ४ हजार ३५२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. दरम्यान, ही फेरी पूर्ण
पुणे : इयत्ता अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या विशेष फेरीत २ हजार ८८८ विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. या फेरीत एकूण ४ हजार ३५२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. दरम्यान, ही फेरी पूर्ण झाल्यानंतर तिसरी विशेष फेरी घेतली जाणार असल्याची माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी दिली.
केंद्रीय प्रवेश समितीमार्फत अकरावी प्रवेशासाठी आतापर्यंत दोन विशेष फेऱ्यांसह सात फेऱ्या घेण्यात आल्या आहेत. दुसऱ्या विशेष फेरीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या फेरीसाठी एकूण १८ हजार ६०५ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी ४ हजार ३५३२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी २ हजार ८८८ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून, १ हजार २११ विद्यार्थी पहिल्या पसंती क्रमानुसार पात्र ठरले आहेत. पात्र विद्यार्थ्यांना दि. २२ व २३ आॅगस्ट रोजी सकाळी ११ ते ४ या वेळेत संबंधित महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागेल. प्रवेशप्रक्रियेच्या संकेतस्थळावरून आपला आॅनलाईन अर्ज क्रमांक टाकून महाविद्यालयाची माहिती पाहता येईल. (प्रतिनिधी)