कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुण पिढी बनतेय टार्गेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:09 AM2021-04-02T04:09:55+5:302021-04-02T04:09:55+5:30
आतापर्यंतच्या रुग्णसंख्येनुसार ३१ ते ४० वयोगटातील २१.१५ टक्के नागरिकांना, ४१ ते ५० वयोगटातील १८.२ टक्के, तर २१ ते ३० ...
आतापर्यंतच्या रुग्णसंख्येनुसार ३१ ते ४० वयोगटातील २१.१५ टक्के नागरिकांना, ४१ ते ५० वयोगटातील १८.२ टक्के, तर २१ ते ३० वयोगटातील १६.५४ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तरुणांनी या लाटेत जास्त काळजी घेण्याची गरज डॉक्टरांकडून व्यक्त केली जात आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागरिकांचा, विशेषतः तरुणांचा निष्काळजीपणा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मास्क न वापरणे, कामाशिवाय घोळक्याने गर्दी करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे असे प्रकार वाढताना दिसत आहेत. एकमेकांशी संपर्क वाढल्याने संसर्गाचा वेगही वाढला आहे. तरुणांकडून कोरोनाचा संसर्ग घरातील ज्येष्ठ व्यक्तींना अथवा संपूर्ण कुटुंबाला होताना दिसत आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात कुटुंबे पॉझिटिव्ह सापडत आहेत. तरुणांची प्रतिकारशक्ती चांगली असल्याने आणि दुसऱ्या लाटेत विषाणूची घातकता कमी झाल्याने तरुण पॉझिटिव्ह आले तरी त्यांच्यामध्ये फारशी लक्षणे नाहीत. तरुण क्वारंटाईन होऊन बरे होत आहेत. मात्र, त्यांच्यामुळे घरातील इतरांना कोरोनाचा गंभीर संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
------
कोरोनाचे राज्यातील एकूण रुग्ण - 2546322
वयोगट रुग्ण टक्केवारी
१० वर्षांखालील 81913 3.22
११ ते २० 168764 6.63
२१ ते ३० 421137 16.54
३१ ते ४० 538463 21.15
४१ ते ५० 458827 18.02
५१ ते ६० 412984 16.22
६१ ते ७० 283232 11.12
७१ ते ८० 16949 5.38
८१ ते ९० 39097 1.54
९१ ते १०० 4894 0.19
१०० च्या पुढे 62 0
------
मृत्यूंमध्ये ज्येष्ठ जास्त
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 9873 मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये 6815 पुरुष तर 3057 स्त्रियांचा समावेश आहे. यापैकी सर्वाधिक मृत्यू 61 ते 70 या वयोगटातील असून ती संख्या 2936 इतकी आहे.