दुसऱ्या लाटेत पालिकेचे दहा कर्मचारी मृत्युमुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:12 AM2021-05-20T04:12:38+5:302021-05-20T04:12:38+5:30
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पालिकेच्या दहा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने प्राण गमवावे लागले आहेत. यातील नऊ जणांनी लसच ...
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पालिकेच्या दहा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने प्राण गमवावे लागले आहेत. यातील नऊ जणांनी लसच घेतली नसल्याचे समोर आले आहे. लस घेण्यात केलेली टाळाटाळ जिवावर बेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा आपल्या कर्मचाऱ्यांना लस देण्याची धावपळ सुरू केली आहे.
शहरात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली. मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत शहरात अडीच लाखांवर नागरिक बाधित झाले. यामध्ये पालिकेच्या १२७ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पालिकेच्या आणखी नऊ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा एकाच आठवड्यात मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाल्याने मृत्यूंची चौकशी करण्यात आली. तेव्हा या नऊ कर्मचाऱ्यांनी लस घेतली नसल्याचे समोर आले. कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी महापालिकेच्या मुख्य इमारतीत लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे.