सुरक्षा विभागाची चौकशी

By admin | Published: September 29, 2016 06:05 AM2016-09-29T06:05:01+5:302016-09-29T06:05:01+5:30

महापालिकेतील सुरक्षा विभागातील कारभाराचा पोलखोल राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी प्रश्नोत्तरात केला. मनमानी कारभार सुरू असून, सुरक्षा कर्मचाऱ्यांची पिळवणूक होत आहे, सुरक्षा

Security Department inquiry | सुरक्षा विभागाची चौकशी

सुरक्षा विभागाची चौकशी

Next

पिंपरी : महापालिकेतील सुरक्षा विभागातील कारभाराचा पोलखोल राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी प्रश्नोत्तरात केला. मनमानी कारभार सुरू असून, सुरक्षा कर्मचाऱ्यांची पिळवणूक होत आहे, सुरक्षा एजन्सी आणि कामगारही बोगस असून, दारूपार्ट्याशिवाय कामगारांना रजा दिल्या जात नाहीत, महिला कामगारांचाही छळ केला जात आहे, असे अनेक मुद्दे सभेच्या निदर्शनास आणून दिले. वृत्तपत्रांची कात्रणे, छायाचित्रांसह पुरावे सादर केले. लोकमतच्या स्टींग आॅपरेशनची चर्चाही झाली. आयुक्तसाहेब, आपल्या कालखंडात शिस्त बिघडली आहे, असा आरोपही सदस्यांनी केला. त्यामुळे आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
लोकमतने महापालिकेच्या सुरक्षेबाबत स्टींग आॅपरेशन केले होते. त्याचे पडसाद आजच्या सर्वसाधारण सभेत उमटले. राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांनी महापालिका सभेला सुरक्षा कामगारांच्या संदर्भात प्रश्न विचारले होते. त्यावर प्रशासनाने प्रश्नांची उत्तरे दिली होती. त्या उत्तरांचा पोलखोल साने यांनी केला. लोकमतच्या स्टींग आॅपरेशनचा उल्लेखही साने यांनी करून, प्रशासनास कोंडीत पकडले.
साने म्हणाले, ‘‘महापालिकेतील सुरक्षेबाबत सुरक्षा विभाग गंभीर नसल्याचे दिसून येते. चाकू, सुरे
घेऊन लोकमतने सुरक्षेचा पोलखोल केला. उद्या कोणी रिव्हॉल्व्हर बॉम्ब घेऊन येईल, महापालिकेच्या सुरक्षेचे काय? किमान वेतनानुसार वेतनही होत नाही. संबंधित ठेकेदारांना लायसन्स नाही. (प्रतिनिधी)

डॉ. श्रीकर परदेशी, राजीव जाधव यांच्या काळात शिस्त होती. आयुक्तसाहेब, आता तुमच्या काळात ती बिघडली आहे. आयुक्तांनी आल्यानंतर कोणतेही चुणूक दाखविण्याजोगे काम केले लाही. आयुक्तांचे लक्ष नाही. याबाबत खुलासा करावा.’’ त्यानंतर सहायक आयुक्त चंद्रकांत खोसे यांनी खुलासा केला. आमच्याकडे छळवणुकीबाबत कोणीही तक्रार केलेली नाही. ती केल्यास निश्चित दखल घेतली जाईल. खोसे यांची प्रशासकीय माहिती चुकीची असल्याचे पुरावे साने यांनी सभागृहापुढे ठेवले. त्यानंतर आयुक्त दिनेश वाघमारे यांनी निवेदन केले. सुरक्षा विभागाची चौकशीसाठी समिती नेमल्याचे सांगितले.

Web Title: Security Department inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.