छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या कोश्यारींना सुरक्षा! हा कोणता न्याय? - संभाजीराजे छत्रपती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 02:51 PM2022-12-02T14:51:10+5:302022-12-02T14:51:22+5:30

संभाजीराजे छत्रपती यांच्या संघटनेकडून पुण्यात राज्यपालांना काळे झेंडे दाखवत आंदोलन

Security for the Koshyaris who speak insultingly about Chhatrapati Shivaji Maharaj! What justice is this? - Sambhajiraje Chhatrapati | छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या कोश्यारींना सुरक्षा! हा कोणता न्याय? - संभाजीराजे छत्रपती

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या कोश्यारींना सुरक्षा! हा कोणता न्याय? - संभाजीराजे छत्रपती

googlenewsNext

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा राज्यभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. त्यातच पुण्यातील पाषाण येथे असलेल्या अभिमान श्री सोसायटी जवळ राज्यपालांचा निषेध नोंदवण्यात आला. संभाजीराजे छत्रपती यांच्या संघटनेकडून काळे झेंडे दाखवण्यात आले. राज्यपालांना काळे झेंडे दाखवले म्हणून अटक! आणि देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या कोश्यारींना सुरक्षा !  हा कोणता न्याय? असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटरवरून उपस्थित केला आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याने सध्या राज्यभरात निषेध होत असताना पुण्यामध्ये त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले आहे. कोश्यारी एका कार्यक्रमासाठी पुण्यामध्ये आलेल आहेत. पाषाण येथे असलेल्या अभिमान श्री सोसायटी जवळ संभाजीराजे छत्रपती यांच्या संघटनेकडून काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवण्यात आला आहे. यावेळी पोलिसांनी स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु संतप्त कार्यकर्त्यांनी राज्यपालांचा जोरदार घोषणाबाजी करीत निषेध नोंदवला.

राष्ट्रवादीकडून आंदोलन 

राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून राज्यपालांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राष्ट्रावादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यपालांचा निषेध म्हणून त्यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवत आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी ही कारवाई केली.

दरम्यान, राजभवन येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. राज्यपाल भगत सिंह कोषयारी हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राजभवनाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Web Title: Security for the Koshyaris who speak insultingly about Chhatrapati Shivaji Maharaj! What justice is this? - Sambhajiraje Chhatrapati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.