सुरक्षारक्षकाने लांबविले ७० लाख
By Admin | Published: April 18, 2016 02:54 AM2016-04-18T02:54:21+5:302016-04-18T02:54:21+5:30
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो संचालक असलेल्या एका कंपनीच्या वॉल्ट रुममधून सुरक्षारक्षकानेच ७० लाखांची रोकड लंपास केली आहे. ही घटना बुधवारी रात्री पावणेबारा
पुणे : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो संचालक असलेल्या एका कंपनीच्या वॉल्ट रुममधून सुरक्षारक्षकानेच ७० लाखांची रोकड लंपास केली आहे. ही घटना बुधवारी रात्री पावणेबारा ते शनिवारी सकाळी साडेनऊच्या दरम्यान नारायण पेठेमध्ये घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अवैद्यनाथ पांडे (रा. मौर्या चौक, वडगाव मावळ), सुशीलकुमार जंत्री (रा. ढोले वाडा, कसबा पेठ) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अभिजीत मगरयांनी फिर्याद दिली आहे. मगर यांच्या रायटर कॉर्पोरेशन प्रा. लि. मुंबई या कंपनीच्या रायटर सेफगार्ड विभागाचे कार्यालय नारायण पेठेमध्ये आहे. तेथे आरोपी पांडे गनमॅन म्हणून काम करीत होता. तर वॉल्ट आॅफीसर म्हणून जंत्री काम करीत होता. (प्रतिनिधी)