सोसायटीचा सुरक्षारक्षकच निघाला चोर, पंचवीस तोळे सोन्याच्या दागिन्यांची केली चोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 05:43 PM2021-01-16T17:43:17+5:302021-01-16T17:43:49+5:30

अटक आरोपीमध्ये एका सोनाराचा देखील समावेश....

The security guard of the society was the thief; who stole twenty five tole gold jewellery | सोसायटीचा सुरक्षारक्षकच निघाला चोर, पंचवीस तोळे सोन्याच्या दागिन्यांची केली चोरी

सोसायटीचा सुरक्षारक्षकच निघाला चोर, पंचवीस तोळे सोन्याच्या दागिन्यांची केली चोरी

googlenewsNext
ठळक मुद्देदहा लाख रुपये किमतीचे 20 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत

विमाननगर : लोहगाव येथील एका उच्चभ्रू  सोसायटीच्या फ्लॅटमधील 25 तोळे सोन्याचे दागिने चोरी करून पसार झालेल्या चोरट्याला विमानतळ पोलिसांनी सापळा रचून अटक केली. याच सोसायटीत पूर्वी  "तो" सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून यांच्याकडून दहा लाख रुपये किमतीचे 20 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. अटक आरोपीमध्ये एका सोनाराचा देखील समावेश आहे.  

संतोष उर्फ लारा काशिनाथ जाधव (वय 35 रा. पोरवाल रोड लोहगाव) याच्यासह त्याचा साथीदार संतोष उर्फ रॉकी  अरुण धनवजीर (वय 34 रा. निंबाळकर नगर लोहगाव) यांच्यासह चोरीचे सोने खरेदी करणारा सोनार अशोक गणेशलाल जानी (वय 54 रा. शनिवार पेठ सातारा) या तीन आरोपींना विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

सौरभ कुंदन हे लोहगाव डी.पी. रोड येथील न्याती एव्हीटा उच्च या सोसायटीत राहतात. 30 डिसेंबर रोजी वडिलांना भेटण्यासाठी कात्रज येथे कुटुंबियांसमवेत गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटमधील लॉक तोडून कपाटातून 25 तोळे सोन्याचे दागिने चोरी केले होते. विमानतळ पोलीस ठाणे तपास पथकातील तांत्रिक विश्लेषण गोपनीय बातम्या आधारावरून आरोपींचा शोध घेत असताना याच सोसायटीत पूर्वी सुरक्षारक्षकांना काम करणाऱ्या संतोष उर्फ लारा जाधव यानेच घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरी केल्याचा गुन्हा केल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यावरून त्याला ताब्यात घेऊन अधिक तपासात त्यानेच संतोष उर्फ रॉकी धनवजीर याच्या मदतीने गुन्हा केल्याचे कबूल केले. चोरी केलेले दागिने त्यांनी सातारा येथील सोनार अशोक जानी यांना विक्री केल्याचे निष्पन्न झाले. 

पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, गुन्हा निरीक्षक मंगेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक हनुमंत गिरी, पोलीस कर्मचारी अविनाश शेवाळे, अशोक आटोळे, उमेश भेंडे, रमेश लोहकरे, विशाल गाडे, संजय आढारी, विनोद महाजन, सचिन भिंगारदिवे, नाना कर्चे, अरुण पठाण, राहुल मोरे, किरण अबदागिरे, वैभव खैरे, प्रशांत कापुरे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास लावला.

Web Title: The security guard of the society was the thief; who stole twenty five tole gold jewellery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.