अनैतिक संबंधासाठी महिलांना आणतात या संशयावरून सुरक्षारक्षकाचा खून करणारे अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 02:58 PM2021-11-24T14:58:29+5:302021-11-24T14:58:45+5:30

अनैतिक संबंधासाठी महिलांना घेऊन येतात, या संशयावरुन रिक्षाचालक व सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण करुन सुरक्षारक्षकाचा खून करणाऱ्या चौघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.

Security guard's killer arrested on suspicion of bringing women for immoral relations | अनैतिक संबंधासाठी महिलांना आणतात या संशयावरून सुरक्षारक्षकाचा खून करणारे अटकेत

अनैतिक संबंधासाठी महिलांना आणतात या संशयावरून सुरक्षारक्षकाचा खून करणारे अटकेत

Next

पुणे : आपल्या जागेत अनैतिक संबंधासाठी महिलांना घेऊन येतात, या संशयावरुन रिक्षाचालक व सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण करुन सुरक्षारक्षकाचा खून करणाऱ्या चौघांना कोंढवापोलिसांनी अटक केली आहे.

ऋषीकेश राजेश गायकवाड (वय २३, रा. भाग्योदयनगर, कोंढवा), किशोर भागवत गायकवाड (वय २९, रा. खडी मशीन चौक) जुबेर पापा इनामदार (वय ३७, रा. इनामदार वाडा, कोंढवा) आणि अमीन मुसा पानसरे (वय २३, रा. चांदतारा चौक, कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. रवी कचरु नागदिवे (वय ५०, रा. उरुळी देवाची) या सुरक्षारक्षकाचा खून झाला होता़ तर, रिक्षाचालक बालाजी भिमा चव्हाण (वय ३५, रा. पीर वस्ती, वडकीगाव) हे जबर जखमी झाले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी नागदिवे यांच्या ओळखीची एक महिला येवलेवाडी येथील डोंगराजवळच्या एका घरात राहते. तिच्याकडे रवी हा बालाजी याच्या रिक्षातून जात असे. त्यावरुन त्या ठिकाणी प्लॉटिंगचे काम करणाऱ्या आरोपींनी हे आपल्या जागेत अनैतिक संबंधासाठी येत असल्याचा समज करुन घेतला होता. त्यावरुन रवी नागदिवे याला सोमवारी फोन करुन बोलावून घेतले होते. बालाजीच्या रिक्षातून रवी नागदिवे तेथे गेला़.

तेव्हा "तुम्ही आमचे जागेत लफडे करण्यासाठी येता बाहेरुन बाया घेऊन येता आणि येथे लफडे करता तुम्हाला आता सोडणार नाही," असे म्हणून त्यांनी दोघांना लाकडी बांबुने डोक्यात, हातापायावर बेदम मारहाण केली. त्यात रवी नागदिवे याचा मृत्यु झाला. त्यानंतर त्यांनी दोघांना बालाजीच्या रिक्षात घालून उंड्री चौकात आणले. तेथे दोघांना रिक्षात सोडून ते पळून गेले. त्यानंतर या दोघांना रुग्णालयात नेले असताना रवी नागदिवे याचा मृत्यु झाला. बालाजी चव्हाण यांचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कोंढवा पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक गोकुळ राऊत तपास करीत आहेत

Web Title: Security guard's killer arrested on suspicion of bringing women for immoral relations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.