"विद्राेह दाबता येणार नाही", पुणे विद्यापीठातील ‘रॅप’ प्रकरणांत डाॅ. जितेंद्र आव्हाडांची उडी
By प्रशांत बिडवे | Published: April 14, 2023 06:02 PM2023-04-14T18:02:41+5:302023-04-14T18:03:06+5:30
तलवार, पिस्तूल आणि मद्याची बाटलीसह रॅप गाणे चित्रीकरण केल्याप्रकरणी पाेलिसांनी रॅप बनविणाऱ्या तरूणाला ताब्यात घेतले
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर तसेच सभागृहात अश्लील शिव्या देत तसेच तलवार, पिस्तूल आणि मद्याची बाटलीसह रॅप गाणे चित्रीकरण केल्याप्रकरणी शुक्रवारी पाेलिसांनी रॅप बनविणाऱ्यां तरूणांना ताब्यात घेतले. दरम्यान, याप्रकरणात आता राष्ट्रवादीचे आमदार डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली आहे. ‘ तरूणांना बेकायदेशीररीत्या चाैकशीसाठी पाेलीस ठाण्यात बसवायचे आणि काहीही चूक नसताना गुन्हे दाखल करायचे याला काय अर्थ आहे? तुम्हाला विद्राेह दाबता येणार नाही’ आशा स्वरूपाचे व्टिट त्यांनी केले आहे.
डाॅ. आव्हाड यांनी केलेल्या व्टिट मध्ये ते म्हणाले, रॅपर तरुणाला चतु:श्रुंगी पोलीस ठाण्याने ताब्यात घेतले आहे. मला याबाबत माहिती मिळताच मी रॅपर ला फोन केला. त्याने समोर बसलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला माझा फोन आहे असं सांगितले. पोलीस कर्मचाऱ्याने उद्धटपणाने मला बोलायचे नाही असे उत्तर दिले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा नंबर मला काढून दे असे मी त्याला सांगितले असता तेथील पोलीस कर्मचारी म्हणाला की माझे वरिष्ठ अधिकारी मोकळे नाहीत ते काही कोणाशी बोलणार नाहीत. मी त्याला म्हटलं फोन खाली ठेवून दे.’
शुभम जाधव ह्या रॅपरला चतु:श्रुंगी पोलीस स्टेशनं पुणे ह्यांनी ताब्यात घेतले आहे. जसे मला ह्याबद्दल समजले तसे मी शुभमला फोन केला. शुभमने समोर बसलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला माझा फोन आहे असं सांगितले. समोरच्या पोलीस कर्मचाऱ्याने उद्धटपणाने मला बोलायचे नाही असे उत्तर दिले. शुभमला मी…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 14, 2023
‘एकतर बेकायदेशीररित्या पोलीस ठाण्याला बसवायचे, काहीही चुकी नसताना गुन्हे दाखल करायचे आणि आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी फोन केला तर जा फोन घेत नाही जा असं उद्धटपणे उत्तर द्यायचे ह्याला काय म्हणायचे? रॅपर हा बौद्ध समाजातील मुलगा असून आंबेडकरी चळवळीत काम करतो.’ असेही आव्हाडांनी व्टिटमध्ये नमूद केले आहे. दरम्यान, ‘ चाेर आले’ हे रॅप गाणे तयार करून ते समाज माध्यमावर प्रसारित करणाऱ्या रॅपरवर गुन्हे दाखल झाले असता जितेंद्र आव्हाडांनी त्यांची पाठराखण केली हाेती.