खरेदी-विक्री संघाघडून बियाण्यांचे वाटप सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:10 AM2021-05-30T04:10:25+5:302021-05-30T04:10:25+5:30
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली, तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांचे सहकार्याने खरेदी-विक्री संघाने ...
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली, तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांचे सहकार्याने खरेदी-विक्री संघाने पशुखाद्य व्यवसाय सुरू केला आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेतकरी दुध उत्पादन करत आहे. कोरोना सारख्या महामारीच्या संकटामध्ये दुधाचे दर स्थिर नव्हते. त्याचप्रमाणे पशुखाद्य दरामध्ये देखील चढ-उतार झाले. तरीदेखील संघाने इफको कॅटल फिड यांचे दर्जेदार, पौष्टिक व सकस पशुखाद्य संस्थेच्या घोडेगाव, मंचर, निरगुडसर, लोणी, धामणी, रांजणी डेपो येथून योग्य व वाजवी दरामध्ये 'ना नफा-ना तोटा' या तत्त्वावर विक्री केली आहे.
तालुका कृषी अधिकारी चौधरी व पंचायत समिती आंबेगाव कृषी अधिकारी कोल्हे यांनी खते व बियाणे विक्रीबाबत संस्थेस मार्गदर्शन केले असून कोणत्याही स्थितीत जादा दराने खत विक्री होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगीतले आहे. त्याचप्रमाणे खते,बि-बियाणे शेतकऱ्यांना वेळेत उपलब्ध होण्यासाठी संघास मार्गदर्शन व सहकार्य करणार असल्याचे देखील सांगितले.
खरीप हंगाम सुरू होत असून शेतकरी खरीप हंगामाच्या पूर्व तयारीसाठी शेतीची मशागत करत आहे. यातच मार्केटमध्ये रासायनिक खतांचे दर वाढणार आहेत अशी चर्चा सुरु आहे. कोरोनाच्या संकटामुळे शेतकऱ्यांनी विक्री केंद्रावर गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत खते, बियाणे खरेदी करावीत. संघाकडे असलेला खत साठा हा एमआरपी दरानेच विक्री करण्यात येणार असून शेतकऱ्यांनी खते, बि-बियाणे खरेदीसाठी येताना आधार कार्ड सोबत आणने अनिवार्य आहे. त्याच प्रमाणे खरेदी केल्याची पक्की पावती शेतकऱ्यांने घेणे गरजेचे देखील आहे.
संघामध्ये सर्व प्रकारची रासायनिक खते योग्य व वाजवी दरामध्ये उपलब्ध करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्न करत आहे. खरीप हंगामामध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांनी फक्त युरिया खरेदीसाठी संघात न येता सर्व प्रकारची खते संघाकडून खरेदी करावी, असे अवाहन संघाचे उपाध्यक्ष रामनाथ बांगर व संचालक मंडळ यांनी केले आहे.
--