शिवनेरी गडावर शिवप्रेमींसाठी चोख आरोग्य सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:17 AM2019-02-21T00:17:38+5:302019-02-21T00:23:10+5:30
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही घेतला लाभ : जिल्हा परिषदेचा उपक्रम
जुन्नर : किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीच्या औचित्याने मोठ्या प्रमाणात येणाºया अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, शिवप्रेमी युवक, ज्येष्ठ नागरिक, बालके यांना गडाची चढाई करताना धाप लागणे, उन्हाने चक्कर येणे, हात पाय मुरगळणे, तसेच तत्सम आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात त्यांना तातडीच्या उपचारांची आवश्यकता वाटल्यास गडावरच उपचार करता यावेत, यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या आरोग्य विभागाने गडावर चढाईच्या मार्गावर दोन ठिकाणी, तर शिवजन्मस्थळ परिसरातदेखील वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी तात्पुरती व्यवस्था केली होती.
आरोग्य व्यवस्थेचा फायदा शिवप्रेमींना तर झालाच, परंतु जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनादेखील गड चढत असताना अॅसिडीटीचा त्रास झल्याने त्यांनी आरोग्य पथकाकडून गोळी घेऊन शिवजयंतीच्या पुढील कार्यक्रमासाठी हजेरी लावली. उच्चपदस्थ अधिकाºयाला त्रास झाला म्हटल्यावर आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाºयांनी तातडीने मुख्य कार्यकारी अधिकारी मांढरे यांना होणाºया त्रासाचे कारण जाणून त्यांना अॅसिडीटीवरील गोळी दिल्यावर त्यांना बरे वाटले. आरोग्य विभागाच्या वैद्यकीय दालनात अत्यावश्यक गोळ्या, औषधे, सलाईन, इंजेक्शन, बँडेज, वेदनाशामक गोळ्या; तसेच आवश्यक वैद्यकीय सुविधा याची उपलब्धता असल्याने सूरज मांढरे यांनी समाधान व्यक्त केले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे यांच्या नियोजनात आरोग्य विभागाची इंगळून, आपटाळे, येणेरे, सावरगाव, येथील ४ वैद्यकीय अधिकारी, २० कर्मचारी गडावर पूर्ण दिवस तैनात होते.
गडावर शिवजयंतीच्या दिवशी किती लोक येतात याचा अंदाज घेऊन पुढील वर्षी किती वैद्यकीय पथके गडावर ठेवावीत, सुलभ शौचालयाची तत्सम सुविधा उपलब्ध करावीत, याचा आराखडा तयार करण्यासाठी जुन्नर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला जिल्हा परिषद प्रशानाने गडावर येणाºया शिवप्रेमींची गणना करण्याचे आदेश देण्यात दिले होते. तर, यावर्षी जिल्हा परिषदेने १२0 सुलभ शौचालयांची व्यवस्था केली होती.