दौंडजच्या सरपंचपदी सीमा भुजबळ व उपसरपंचपदी नंदा कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:12 AM2021-02-12T04:12:21+5:302021-02-12T04:12:21+5:30
पुरंदर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या दौंडज महत्त्वाचे आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक बुधवारी पार पडली. इतर मागास प्रवर्गासाठी ...
पुरंदर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या दौंडज महत्त्वाचे आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक बुधवारी पार पडली. इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या सरपंचपदासाठी जाणीव हाॅकर्स संघटनेच्या अध्यक्षा सीमा नीलेश भुजबळ व अलका महादेव माने यांनी अर्ज भरले. गुप्त पद्धतीने झालेल्या मतदानात सीमा भुजबळ याना ५ व अलका महादेव माने यांना ४ मते मिळाली. तर उपसरपंचपदी नंदा जगन्नाथ कदम यांचा एकमेव अर्ज आला होता. यामुळे निवडणूक अधिकारी काशीनाथ लाड यांनी सीमा भुजबळ यांची सरपंच तर नंदा कदम यांची उपसरपंच म्हणून निवड केली. सहायक निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक सुनिल माने यांनी काम पाहिले.
या वेळी दत्तात्रय कदम, जगन्नाथ कदम, नीलेश भुजबळ, मधुकर इंदलकर, प्रताप इंदलकर, विलास कदम, शरद जाधव आदी उपस्थित होते.