भूगावात मिलमधून २० टन धान्य जप्त

By admin | Published: October 2, 2015 12:46 AM2015-10-02T00:46:12+5:302015-10-02T00:46:12+5:30

अन्नधान्य पुरवठा खात्याने भूगाव येथील मिलवर छापा घालून स्वस्त धान्य दुकानात पाठविलेले वितरणाचे २० टन धान्य जप्त केले़ या मिलवर कारवाई करून तिला सील करण्यात आले आहे़

Seized 20 tons of grain from ground mill | भूगावात मिलमधून २० टन धान्य जप्त

भूगावात मिलमधून २० टन धान्य जप्त

Next

पुणे : अन्नधान्य पुरवठा खात्याने भूगाव येथील मिलवर छापा घालून स्वस्त धान्य दुकानात पाठविलेले वितरणाचे २० टन धान्य जप्त केले़ या मिलवर कारवाई करून तिला सील करण्यात आले आहे़ त्यात चार टेंपो, ८ टन गहू आणि १२ टन तांदळाचा समावेश आहे़
भूगाव परिसरात कोणतीही परवानगी नसताना एक आटा मिल असून येथे शिधापत्रिकाधारकांना वितरित करण्यात येत असल्याचा धान्याचा साठा उचल करीत असल्याची माहिती मिळाली होती़ भीमशाही संघटनेचे शहराध्यक्ष राम पालवे यांनी त्याची पाहणी केली़ दुपारच्या वेळी काही टेंपो आणि महिंद्रा पिकअप व्हॅनमधून मोठ्या प्रमाणावर धान्य येथे आणले जात असल्याचे त्यांना दिसून आले़ त्यांनी काही दिवस येथे लक्ष ठेवले़ आज खडकी येथील स्वस्त धान्य दुकानातून दुपारी तीन टेंपोमधून गहू भरुन तो या मिलवर आणण्यात आला़ या टेंपोंच्या पाळतीवर पालवे होते़ त्यांनी याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी ज्योती कदम यांना दिली़ कदम व त्यांचे सहकारी संजीव साखरे, अनिल टेमक, संतोष शेळके यांनी पौड पोलिसांच्या मदतीने या मिलवर छापा घातला़ त्यात गव्हाबरोबरच तांदळाचीही पोती या मिलमध्ये असल्याचे आढळून आले़ पौड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सहायक फौजदार रमेश वाघवले, हवालदार ए़ ए़ शेख, ए़ व्ही़ बनसोडे, एस़ ए़ मुळे, व्ही़ व्ही़ चौबे यांनी या कारवाईत भाग घेतला़
भूगावमधील या मिलचे मालक चौधरी असून, येथे शहरातील विविध भागातील स्वस्त धान्य दुकानातून गहू व तांदूळ आणून त्यांचे पीठ करण्यात येते़ हे पीठ पॅकिंग करून बावर्ची या नावाने बाजारात विकण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे़
पौड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, वाहनचालक चंद्रकांत सदाशिव बामणे (वय ४०) आणि बबनराव राहू कोकरे (वय ३५) यांना ताब्यात घेण्यात आले आहे़

Web Title: Seized 20 tons of grain from ground mill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.