मोक्का कारवाई झालेल्या फरारी गुंडाकडून अमली पदार्थ जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:12 AM2021-07-27T04:12:26+5:302021-07-27T04:12:26+5:30
पुणे : मोक्का कारवाई केल्यानंतर फरारी झालेल्या सराईत गुंडाला कोंढवा पोलिसांनी पकडून त्याच्याकडून मेफेड्रोन हे अमली पदार्थ जप्त केले ...
पुणे : मोक्का कारवाई केल्यानंतर फरारी झालेल्या सराईत गुंडाला कोंढवा पोलिसांनी पकडून त्याच्याकडून मेफेड्रोन हे अमली पदार्थ जप्त केले आहेत. अफाक अन्सार खान (वय २४, रा. रविवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
फरासखाना पोलिसांनी खान याच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई केली होती. या कारवाईनंतर तो फरार झाला होता. कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार जोतिबा पवार यांना खान याच्याविषयी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी उंड्री येथील टायनी कंपनीसमोर सापळा लावला. दुचाकीवरून आलेल्या खान याला पकडले. त्याच्याकडून २ ग्रॅम मेफेड्रोन व दुचाकी असा ६० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक शब्बीर सय्यद, सहाय्यक निरीक्षक चेतन मोरे, रमेश गरुड, तुषार आल्हाट, संजीव कळंबे, नीलेश वणवे, नीलेश देसाई आदींनी ही कारवाई केली.
--