राज्य उत्पादन शुल्क यांच्या कारवाईत तब्बल दोन लाखांचा मद्यसाठा हस्तगत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:48 PM2021-03-21T16:48:25+5:302021-03-21T17:11:17+5:30

कारवाईत आढळले मद्यविक्रीचे एकूण १७ बॉक्स

Seizure of liquor worth Rs 2 lakh in state excise action. | राज्य उत्पादन शुल्क यांच्या कारवाईत तब्बल दोन लाखांचा मद्यसाठा हस्तगत.

राज्य उत्पादन शुल्क यांच्या कारवाईत तब्बल दोन लाखांचा मद्यसाठा हस्तगत.

Next
ठळक मुद्देआरोपींविरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

मोरगांव: राज्य उत्पादन शुल्काच्या जी विभागाकडून गोवा राज्यात विक्रीस असणाऱ्या दारूची अवैध वाहतुक करताना तब्बल दोन लाखांचा मुद्देमाल पकडला आहे. याप्रकरणी गाडीचा चालक प्रशांत अरुणराव भोर (वय ३१ रा अहमदनगर) यास ताब्यात घेतले आहे . दौंड तालुक्यातील कानगाव - हातवळण या रस्त्यावर २१ मार्चला ही कार्यवाही करण्यात आली. 

गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या मद्याची अवैध वाहतूक कानगाव परिसरातून होणार असल्याची  माहीती राज्य उत्पादन शुल्काच्या जी विभागास समजल्यानंतर सापळा रचण्यात आला.  कानगांव –हातवळण रस्त्यावरील प्राथमिक शाळेजवळ संशयीत कार थांबवली गेली. कारची तपासणी केली असता प्रथमदर्शनी खाकी रंगाचे बॉक्स आढळून आले. सखोल तपासणी केल्यावर त्यामध्ये मद्याच्या ब मॅक्डोवल व्हीस्कीचे ९, इंम्पेरियल ब्लू व्हीस्कीचे ४, इम्पिरीअल ब्ल्यू व्हीस्कीचे ४,  असे एकूण १७ बॉक्स जप्त करण्यात आले.
जप्त वाहन व मद्याची एकूण किंमत २ लाख ४३ हजार ५६० रुपये आहे. आरोपींविरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक आरोपींना मे. न्यायालय दौंड, पुणे येथे हजर करण्यात आले आहे. या विभागाने वारंवार अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणून शासनाच्या महसूलाची हानी टाळली आहे.  
सदर कारवाईचा पुढील तपास एस. के. कान्हेकर करत आहेत.

Web Title: Seizure of liquor worth Rs 2 lakh in state excise action.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.