अवसरीमधील २६ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:08 AM2021-06-17T04:08:04+5:302021-06-17T04:08:04+5:30
आत्तापर्यंत यावर्षीचे पहिले सत्र संपेपर्यंत पुणे परिसरातील बजाज ऑटो कंपनीने २१ विद्यार्थ्यांची निवड केली. यामध्ये यंत्र अभियांत्रिकी १६, ऑटोमोबाईल ...
आत्तापर्यंत यावर्षीचे पहिले सत्र संपेपर्यंत पुणे परिसरातील बजाज ऑटो कंपनीने २१ विद्यार्थ्यांची निवड केली. यामध्ये यंत्र अभियांत्रिकी १६, ऑटोमोबाईल २ व इलेक्ट्रिकलच्या तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. इन्फोसिस या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीने २ विद्यार्थ्यांची, तर बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य एल अँड टी कन्स्ट्रक्शन्स या कंपनीने ३ विद्यार्थ्यांची निवड केली आहे .
टाटा मोटर्स, जीई एव्हिएशन, फोक्सवॅगन- स्कोडा, महिंद्रा व्हेईकल्स, जॉन डियर इक्विपमेंटस, किर्लोस्कर चिलर्स, किर्लोस्कर पंप्स अशा विविध नामांकित कंपन्यांकडून पदविका अभियंत्यांना सातत्याने मागणी होत असून येत्या काही दिवसांत उर्वरित विद्यार्थ्यांचेही प्लेसमेंट होणार आहे, अशी माहिती आस्थापना विभागाकडून दिली. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या रोजगारक्षम शिक्षण देण्याच्या या धोरणानुसार संस्थेचे सर्व प्राध्यापक वर्ग व कर्मचारी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे प्राचार्य डॉ. दिलीप नंदनवार यांनी सांगितले.