राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी ३० मल्लांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:13 AM2021-09-07T04:13:21+5:302021-09-07T04:13:21+5:30

इंदापूर : उत्तर प्रदेश मधील अमेठी येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी, इंदापूर येथे राज्यस्तरीय कुस्ती निवड चाचणी स्पर्धा उत्साहात ...

Selection of 30 wrestlers for National Wrestling Championship | राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी ३० मल्लांची निवड

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी ३० मल्लांची निवड

Next

इंदापूर : उत्तर प्रदेश मधील अमेठी येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी, इंदापूर येथे राज्यस्तरीय कुस्ती निवड चाचणी स्पर्धा उत्साहात पार पडली. शनिवारी दि. ४ रोजी प्रथम टप्प्यात एकूण १० वजनगटांच्या फ्री स्टाईल प्रकारच्या मुलांची कुस्ती स्पर्धा झाली. तर रविवारी दि. ५ रोजी मुलांची ग्रीको रोमन प्रकारातील कुस्ती व मुलींची फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धा पार पडली. यामधून राज्यातील विविध ठिकाणच्या ६३० मल्लांनी सहभाग घेतला होता. यातील केवळ ३० मल्लांची निवड करण्यात आली असून, हे कुस्तीगीर आता दि. १६ ते १९ सप्टेंबरदरम्यान उत्तर प्रदेशमधील अमेठी येथे, २३ वर्षांखालील वयोगटात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

या कुस्ती निवड चाचणी स्पर्धांचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम व सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, कार्यालयीन सचिव ललित लांडगे, सहसचिव बंकट यादव, आंतरराष्ट्रीय पंच दिनेश गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली ३० पंचांनी कुस्ती स्पर्धा यशस्वी पार पाडली. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धेचे संयोजक व मारकड कुस्ती केंद्राचे मार्गदर्शक मारुती मारकड यांच्या टीमने प्रयत्न केले.

२३ वर्षाखालील मुलांचा ग्रीको रोमन कुस्ती प्रकारात, पुढील स्पर्धकांनी प्रथम क्रमांक मिळविला. राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी ५५ किलो वजनगटात पै. मोहन रोकडे (धुळे), ६० किलो वजनगटात पै. सद्दाम शेख ( कोल्हापूर ), ६३ किलो वजनगटात पै. भाऊसाहेब सदगीर (नाशिक), ६७ किलो वजनगटात पै. नाथा पवार ( सांगली ), ७२ किलो वजनगटात पै. ओंकार पाटिल ( कोल्हापूर), ७७ किलो वजनगटात पै. गोकुळ यादव ( मुंबई उपनगर ), ८२ किलो वजनगटात पै. अनिकेत जाधव ( मुंबई शहर ), ८७ किलो वजनगटात पै. मनोज कातोरे ( नाशिक ), ९७ किलो वजनगटात पै. सुरज गायकवाड ( पुणे शहर ), १३० किलो वजनगटात पै. तुषार डुबे ( पुणे ) यांनी प्रथम क्रमांक मिळवून आपले राष्ट्रीय स्पर्धेसाठी स्थान निश्चित केले आहे.

मुलींच्या कुस्ती स्पर्धेत पुढील स्पर्धकांनी प्रथम क्रमांकाचे यश संपादन करीत राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले. यामध्ये ५० किलो वजनगटात कीर्ती गुडलेकर ( धुळे ), ५३ किलो वजनगट स्वाती शिंदे ( कोल्हापूर ),५५ किलो वजनगट विश्रांती पाटिल ( कोल्हापूर ), ५७ किलो वजनगट दिशा कारंडे ( कोल्हापूर ), ५९ किलो वजनगट भाग्यश्री फंड (अहमदनगर ), ६२ किलो वजनगट सोनाली मंडलिक (अ. नगर), ६५ किलो वजनगट सृष्टी भोसले ( कोल्हापूर ), ६८ किलो वजनगट वेदांतीक पवार (कोल्हापूर), ७२ किलो वजनगट सानिका पवार ( बीड ), ७६ किलो वजनगट प्रतीक्षा बागडी ( सांगली ) यांनी यश संपादन केले असून, फ्री -स्टाईल कुस्ती प्रकारात मुली प्रतिनिधित्व करणार आहेत.

या वेळी कै. भगवानराव भरणे सहकारी पतसंस्थेच्या वतीने उपस्थित सर्व मल्लांच्या खुराकाची व्यवस्था करण्यात आली होती. तर या वेळी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे, बाळासाहेब ढवळे, नवनाथ रुपनवर, पिंटू काळे, राजेंद्र चोरमले, महेंद्र रेडके, लक्ष्मण रेडके आदी मान्यवर उपस्थित होते, तर समालोचन बाबा लिमण व प्रशांत भागवत यांनी केले.

२३ वर्षांखालील फ्री- स्टाईल राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेले मल्ल

५७ किलो पै. सौरभ इगवे, ६१ किलो पै. सुरज कोकाटे, ६५ किलो पै. सौरभ पाटील, ७० किलो पै. रविराज चव्हाण,७४ किलो पै. प्रथमेश गुरव, ७९ किलो पै. समीर शेख, ८६ किलो पै. बाळू बोडके, ९२ किलो पै. ओंकार जाधवराव,९७ किलो पै. सुनील खताळ, १२५ किलो पै. आदर्श गुंड, हे मल्ल २३ वर्षांखालील फ्री- स्टाईल राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील.

०६ इंदापूर कुस्ती

राज्यस्तरीय कुस्ती निवड चाचणी स्पर्धेत सामना सुरु करताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.

Web Title: Selection of 30 wrestlers for National Wrestling Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.