राष्ट्रीयस्तर परीक्षेसाठी पुणे जिल्ह्यातून ७५ विद्यार्थ्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:08 AM2021-06-19T04:08:18+5:302021-06-19T04:08:18+5:30
पुणे : राज्यस्तरीय राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेतून पुणे जिल्ह्यातील ७५ विद्यार्थ्यांची राष्ट्रीयस्तर परीक्षेसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या ...
पुणे : राज्यस्तरीय राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेतून पुणे जिल्ह्यातील ७५ विद्यार्थ्यांची राष्ट्रीयस्तर परीक्षेसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने ही परीक्षा घेण्यात आली होती, अशी माहिती जिल्हा परिषद माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील एकूण २३ केंद्रावर २३ डिसेंबर २०२० रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील ९ हजार ३१६ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये राज्यातील ८२१ पैकी एकट्या पुणे जिल्ह्यातून ७५ विद्यार्थी निवडले आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक विद्यार्थी निवडले आहेत. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पुणे जिल्हा अध्यापक संघ आणि पुणे जिल्हा परिषद माध्यमिक विभाग यांनी संयुक्तपणे २२ दिवस व्याख्यानमालेचे आयोजन केले होते.