अथर्व घुले याची यंग सायंटिस्ट म्हणून निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:08 AM2021-01-10T04:08:18+5:302021-01-10T04:08:18+5:30
नॅशनल कौन्सिल ऑफ टिचर सायंटिस्ट इंडिया, ए.पी.जे.अब्दुल कलाम कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट इंडिया, रमण सायन्स अँड टेक्नोलॉजी फौंडेशन इंडिया ...
नॅशनल कौन्सिल ऑफ टिचर सायंटिस्ट इंडिया, ए.पी.जे.अब्दुल कलाम कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट इंडिया, रमण सायन्स अँड टेक्नोलॉजी फौंडेशन इंडिया यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या इंडिया इंटरनॅशनल साराभाई स्टुडंट सायंटिस्ट अवॉर्ड २०२० प्राप्त झाला आहे.
संपूर्ण भारतातून ५००० पेक्षा जास्त विद्यार्थी गेले सहा महिने इस्रोच्या शास्त्रज्ञांशी झूम मीटिंग व वेबिनारद्वारे संपर्कात होते. त्यापैकी ६३ विद्यार्थी सुरुवातीला निवडले गेले. अंतिम अवॉर्ड कार्यक्रमात १३ व्या क्रमांकाने यंग सायंटिस्ट म्हणून निवडला गेला आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थी विज्ञान क्षेत्रात पाठीमागे नाहीत. आवड, आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, नवनवीन माहिती जाणून घेण्याची आवड असेल तर यश निश्चितच मिळते, असे प्रतिपादन विद्यालयाचे प्रा. राजेंद्र काकडे यांनी केले.