दौंड तालुक्यातील खोर व कौठडी गावांची मनरेगा योजनांंसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:11 AM2021-03-18T04:11:39+5:302021-03-18T04:11:39+5:30
केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील असलेल्या ग्रामविकासाचा पाया भक्कम व्हावा व मनरेगा कामांबाबतचा रोजगार ग्रामीण भागांमधील गावं-गावामध्ये पोहोचावा, यामागचा उद्देश ...
केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील असलेल्या ग्रामविकासाचा पाया भक्कम व्हावा व मनरेगा कामांबाबतचा रोजगार ग्रामीण भागांमधील गावं-गावामध्ये पोहोचावा, यामागचा उद्देश आहे. दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजिंक्य येळे व माजी उपसभापती नितीन दोरगे उपस्थितीत खोर व कौठडी या दोन गावांच्या नावाची मनरेगासाठी घोषणा करण्यात आली आहे.
सध्या ह्या योजनेचे नाव बदलून 'शरद पवार ग्रामसमृद्धी योजना' असे करून नवीन शेतीविषयक कामांचा ह्या योजनेत समावेश करण्यात आला आहे. तसेच काही कामांच्या अटी शिथिल केल्या गेल्या आहेत. ही अशी योजना आहे ज्या माध्यमातून ग्रामपंचायत प्रत्येक कुटुंबाला कुठले न कुठले काम मनरेगा देऊन लाभ मिळवून देऊ शकते. ग्रामसभेच्या माध्यमातून कामे घेतली जातात व कृती आराखडा तयार होतो. या वेळी मनरेगामध्ये गाईगोठा प्रकरण करणे, शेळीपालन, कुक्कुटपालन, बांधबंदिस्ती वैयक्तिक लाभाच्या योजना याविषयी माहिती देण्यात आली. तसेच १०० कुटुंबांना १०० दिवस रोजगारविषयी मार्गदशन करण्यात आले. या वेळी ग्रामंपचायत सदस्या उज्ज्वला विकास चौधरी यांच्या वतीने पिंपळाचीवाडी येथे पाच गाईगोठा प्रकरणे (वैयक्तिक लाभ रक्कम ७७००० रूपये प्रत्येकी) पंचायत समितीकडून मंजूर करण्यात आली आहे. या कार्यक्रमाप्रसंगी दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, माजी उपसभापती नितीन दोरगे, सरपंच वैशाली अडसूळ, उपसरपंच पोपट चौधरी, रामचंद्र चौधरी, विकास चौधरी, मारुती फडतरे, संदीप अडसूळ, सागर चौधरी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामीण भागातील गरजू व्यक्तीने या योजनेचा फायदा घ्यावा.
मनरेगा ही केंद्र शासनस्तरावरील योजना असून दौंड तालुक्यातील दुष्काळी भाग असलेल्या खोर व कौठडी या दोन गावांची निवड केली असून, जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
नितीन दोरगे (मा. उपसभापती, दौंड पंचायत समिती)
ग्रामविकासाचा राजमार्ग असलेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेसाठी (मनरेगा) दौंड तालुक्यातील खोर व कौठडी या दोन गावांची निवड करण्यात आली आहे.