जलजीवन पाणी योजनेसाठी खोर गावाची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:09 AM2021-03-21T04:09:51+5:302021-03-21T04:09:51+5:30
दौंड तालुक्यातील खोर ह्या गावाची या जलजीवन पाणी मिशन अंतर्गत व्यवस्थापन समिती राज्यपाणी फाउंडेशन व स्वच्छता मिशन अंतर्गत निवड ...
दौंड तालुक्यातील खोर ह्या गावाची या जलजीवन पाणी मिशन अंतर्गत व्यवस्थापन समिती राज्यपाणी फाउंडेशन व स्वच्छता मिशन अंतर्गत निवड करण्यात आली आहे. खोर येथील पिंपळाची वाडी या महसुली गाव यामध्ये घेण्यात आले असून या अंतर्गत पाटलाचीवाडी, शेराचीवाडी या वाड्याचा समावेश होत आहे. या घटित केलेल्या समिती अंतर्गत कार्यकारी केंद्र शासनाच्या पथकाने खोर गावाचा दौरा केला असून यामध्ये जिल्हा पाणी पुरवठा अभियंता खाडे , राज्यपाणी विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता प्राजक्ता करणाळे, स्वच्छता विभागाचे मंदार सर ,अनुजा भिडे, जिल्हा परिषद पुणे सहाय्यक अभियंता बिराजदार, किशोरी मांढरे यांनी या योजनेत समाविष्ट केलेल्या गावाला भेट दिली. असून त्या ठिकाणची पाण्या विषयाची पाहणी करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने या निवड करण्यात आलेल्या गावाची समितीने पाहणी दौऱ्यामध्ये पाणी व्यवस्थापन व्यवस्था कशी आहे, पिण्याचे पाणी कोठून व दिवसातून किती वेळा येते, पाण्यात क्षारतेचे प्रमाण किती आहे, गावामध्ये बोअर वेल किती आहेत, विहिरींची संख्या किती आहे, किती दिवस बोअरवेल व विहिरींना पाणी टिकते, खाजगी व सरकारी विहिरी किती आहेत. नळपुरावठा योजना चालू आहेत का बंद आहेत यांची माहिती जाणून घेतली. हा प्रत्यक्षदर्शी अहवाल पुढे जिल्हा स्तरावर पाठविला जाणार असून त्यानंतर पुढील उपाय योजना सुरू करण्यात येणार आहे. मात्र खोर ग्रामपंचायतला केंद्र शासनाच्या टीमने विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देता न आल्याने अनेक मुद्दे त्यांनी एका आठवड्यात मेल वर पाठविण्यास सांगितले असून त्यानंतर पुढील कार्यक्रमाची दिशा ठरवली जाणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते विकास चौधरी यांनी सांगितले आहे.
यावेळी खोर ग्रामपंचायतच्या सरपंच वैशाली अडसूळ, उपसरपंच पोपट चौधरी, दौंड पंचायत समितीचे पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी वर्ग,ग्रामपंचायतच्या सदस्या उज्वला चौधरी, ग्रामविकास अधिकारी एम.जी.पाडुळे व ग्रामस्थ विकास चौधरी, प्रकाश चौधरी उपस्थित होते.
दौंड तालुक्यातील खोर ह्या गावाची या जलजीवन पाणी मिशन अंतर्गत व्यवस्थापन समिती राज्यपाणी फाउंडेशन व स्वच्छता मिशन अंतर्गत निवड करण्यात आली असून या समितीने प्रत्यक्षात विहिरी वर जाऊन पाहणी केली
2 Attachments