खेड तालुक्यातून 'महाराष्ट्र केसरी’ शिवराज राक्षेची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:17 AM2021-03-04T04:17:09+5:302021-03-04T04:17:09+5:30
बहुळ व सिद्धेगव्हाण (ता. खेड) येथील मल्लसम्राट कुस्ती संकुलात आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण आमदार ...
बहुळ व सिद्धेगव्हाण (ता. खेड) येथील मल्लसम्राट कुस्ती संकुलात आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण आमदार दिलीप मोहिते-पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सयाजीराजे मोहिते, युवानेते विजयसिंह शिंदे-पाटील, सरपंच गणेश वाडेकर, उद्योजक अविनाश मोहिते, सुनील शितोळे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी मयूर मोहिते, अॅड. सचिन साबळे, केशव साबळे, काळूराम साबळे, पंकज हरगुडे, माऊली वाडेकर, संभाजी आरेकर, बाळासाहेब खलाटे, राजाराम साबळे, शशिकांत मोरे, उमेश मोरे, नानासाहेब खलाटे, आनंद पोतले, संतोष साबळे, तुषार पवार, गणेश बोत्रे, विशाल सोनवणे, दीपक डोगरे, सुनील साबळे, प्रदीप तांबे, यशवंत मडके आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मल्लसम्राट केसरी पै. अनिल प्रभाकर साबळे, संचालक संदीप साबळे आदींसह मल्लसम्राट कुस्ती संकुलाच्या पैलवानांचे विशेष सहकार्य लाभले.
गादी विभागातील पात्र खेळाडू व वजनगट
अजित गाडे (५७ किलो), प्रकाश डोंगरे (६१ किलो), सतीश पडवळ (६५ किलो), चैतन्य साबळे (७० किलो), सौरभ सोनवणे (७४ किलो), कार्तिक कुऱ्हाडे (७९ किलो), करण गायकवाड (८६ किलो), सुरज सावंत (९२ किलो), प्रणव साबळे (९७ किलो) महाराष्ट्र केसरी गट शिवराज राक्षे.
माती विभाग : विशाल थोरवे (५७ किलो), हर्षद घोलप (६५ किलो), गोरक्ष लोखंडे (६१ किलो), गणेश निंबाळकर (७० किलो), अक्षय उघडे (७४ किलो), विशाल वाळुंज (७९ किलो), जुनेद शेख (८६ किलो), कार्तिक साबळे (९२ किलो), साहिल गाडे (९७ किलो), महाराष्ट्र केसरी गट
अक्षय गावडे.
बहुळ (ता. खेड) येथे खेड तालुका निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ करताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे व अन्य मान्यवर.(छाया : भानुदास पऱ्हाड)